Home चंद्रपूर महिलांच्या विश्वासाला तडा; राजुरा महिला बचत प्रकरणात लाखोंचा घोटाळा

महिलांच्या विश्वासाला तडा; राजुरा महिला बचत प्रकरणात लाखोंचा घोटाळा

121

▪️राजुरा हादरलं! बचत गटातील रक्कमेसह आरोपी पसार

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२६एप्रिल):-शहरातील जवाहर नगर येथील एका बचत गटातील महिलांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज बाबाराव हारगुडे ,राहणार जवाहर नगर हा सध्या फरार असून राजुरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

            मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी राजुरा पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी पंकज हारगुडे याने राजुरा येथील जवाहरनगर वॉर्डमधील सुमारे ४० महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांच्याकडून एकूण सुमारे २८ लाख ७० हजार रुपये जमा करण्यात आले.

महिलांचा विश्वास संपादन करून आरोपीने पैसे वाटप करण्याच्या बहाण्याने ते स्वतःजवळ ठेवले आणि नंतर पैसे मोजण्याची मशीन आणतो म्हणून फरार झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीचा शोध लागलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात अधिक माहिती मिळावी व आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजुरा पोलिसांकडून करण्यात आले आहे.