Home महाराष्ट्र टेंडर संपलेल्या पूर्ण सेवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी-नगर...

टेंडर संपलेल्या पूर्ण सेवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी-नगर अध्यक्ष सौ. उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे

19

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.22एप्रिल):-नगर परिषद च्या वतीने देण्यात आलेल्या टेंडर ची मुद्दत संपली असता, या टेंडर च्या अनधिकृत,बेकायदेशीर, नियमबाह्य, वसुली करीत आहेत, ती वसुली तात्काळ थांबवण्याची मागणी नगर अध्येक्ष, सौ. उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे यांनी मुख्य अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

या पत्राद्वारे असे कळवले आहे की नगर परिषद द्वारे आठवडी बाजार शुल्क वसुली, पार्किंग वसुली, जाहिरात फलक परवानगी शुल्क वसुली, जनावरच्या बाजार शुल्क वसुली, यांची टेंडरची मुद्दत संपली असता नगर परिषद प्रशासन आपल्या स्त्रावर वसूल करत असल्या ची बाब समोर निदर्शनाश आली. ही वसुली बेकायदेशीर, नियमबाह्य , असून या अनुषंगाने नगर अध्येक्ष या नात्याने आपल्या निदर्शनास देण्यात येत आहे.

वरील सर्व संपलेल्या टेंडर ची सुरु असलेली वसुली तात्काळ थांबवावी व नवीन प्रकिर्या पूर्ण होई पर्यन्त संबंदीत पूर्ण सेवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी,व सदरील प्रकरणात झालेल्या वसुलीचा सविस्तर अहवाल पाच दिवसाच्या आत सादर करावा. संबधीत प्रकारणात जबाबदार अधिकारी व्यक्ती निश्चित करून त्या बाबत आवशक प्रशासकीय कारवाई करावी अन्यथा पुढील प्रशासकीय कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. या पत्रावर नगर अध्येक्ष सौ. उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे यांची स्वाक्षरी केली आहे.