Home महाराष्ट्र सरस्वती विद्यालयात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत संपन्न

सरस्वती विद्यालयात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत संपन्न

48

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27एप्रिल):-विधानसभा क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडवण्यात शाळा म्हणून श्री सरस्वती विद्यालय मध्ये 26 एप्रिल रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 केंद्र संचालक एस.एन.मठपती,उपकेंद्र संचालक श्रीमती सी.बी.घोळवे, मुख्याध्यापक मादरपल्ले नियोजनात संपन्न झाली.

 विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रतिवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असून शिष्यवृत्ती पहिला पेपर-1 भाषा आणि गणित तर पेपर-2 इंग्रजी बुद्धिमत्ता या विषयावर होत असते त्यामुळेच श्री सरस्वती विद्यालयाच्या नियोजनात एकूण विद्यार्थी 366, उपस्थित विद्यार्थी 324 तर अनुपस्थित 42 विद्यार्थी असल्याचे दिसून आले. सदरील विद्यार्थ्यांमध्ये मराठी + सेमी- 321, उर्दू-22, हिंदी-6, इंग्रजी- 17, विद्यार्थी परीक्षेस दिसून आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मध्यंतरात अल्पहार म्हणून खिचडीही वाटप करण्यात आली अत्यंत शिस्तबद्ध नियमात नियोजन असल्यामुळे पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.