Home चंद्रपूर सुसंस्कार शिबीर ही काळाची गरज-राजेंद्र मोहितकर

सुसंस्कार शिबीर ही काळाची गरज-राजेंद्र मोहितकर

24

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20मे):-श्रीगुरूदेव सेवामंडळ सरडपार ( काग) च्यावतीने दहा दिवसाचे श्रीगुरूदेव सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

         या शिबिरात अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रमचे जीवन प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरूजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लहान मुलांना संस्कारित करण्यासाठी अशी शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे. मोबाईलच्या युगात चांगल्या गोष्टी आत्मसात न करता आजची पिढी वाईट मार्गाकडे जात आहे, सुसंस्कार शिबिरात घेतलेले संस्कार,शिक्षण हे दीर्घकाळ टिकत असतात. या शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी जीवनात कधीही वाईट मार्गाकडे वळत नाही.

          आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे,विद्यार्थ्यांनी सुसंस्काराबरोबरच नियमित अभ्यास करावा तरच त्यांचे जीवन उज्ज्वल होईल.सुसंस्कार शिबिरे घेणे हे खऱ्या अर्थाने प्रचारकाचे काम आहे.

        वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार सर्वञ पोहचविण्यासाठी आता शाळा- काॅलेजमधील मुलांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ज्या गावात सेवामंडळ नाही, तिथे निर्माण करण्याची गरज आहे. ज्या भागात गुरूदेव सेवामंडळाचे काम नाही, तिथे कार्य सुरू करण्याची गरज आहे.

         सुसंस्कार शिबिरातून पुढे देशात चांगले व आदर्श नागरिक प्रत्येक गावात तयार होतील, असेही मोहितकर म्हणाले.

                   याप्रसंगी अरविंद देवतळे, कडूकर दादा, गजानन ठाकरे व असंख्य गुरूदेवसेवक उपस्थित होते. या शिबिरात १५ ते २० गावातील ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.