

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.22मे):-ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना तसेच वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव व परीक्षेस बसण्याच्या सवलती घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती संबंधित राखीव प्रवर्गातच करण्याच्या शासन निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवार, 24 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता सीडीसीसी बँक हॉल, नागपूर रोड, चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत ओबीसी (विजा, भज, विमाप्र), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शासनाने संबंधित निर्णयाला केवळ स्थगिती दिली असून तो पूर्णपणे रद्द झालेला नसल्याने या विरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या बैठकीस विविध समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिन राजूरकर, जयदीप रोडे व कृष्णा मसराम यांनी केले आहे.







