Home चंद्रपूर मोकाट गायीवर यशस्वी उपचार; नागरिक व पशुवैद्यकीय विभागाची तत्पर मदत

मोकाट गायीवर यशस्वी उपचार; नागरिक व पशुवैद्यकीय विभागाची तत्पर मदत

33

▪️सभापती अनंता ताजने यांचे पशुप्रेम; स्व खर्चातून गायीवर केले उपचार

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२७मे):-राजुरा शहरातील शिवाजी वॉर्ड परिसरात एका मोकाट गायीची प्रसूती झाल्यानंतर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसूतीनंतर गायीचे गर्भाशय बाहेर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र पशुवैद्यकीय विभागाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे त्या गायीवर यशस्वी उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तेलंग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गायीला सुरक्षितरीत्या नियंत्रणात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.

विशेष म्हणजे नगर परिषद राजुरा चे सभापती अनंता ताजने यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून उपचाराची पाहणी केली तसेच स्वतःच्या खर्चातून गायीच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. या घटनेतून पशुप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. यावेळी स्थानिक नागरिकांसोबत कुणाल मोकळे उपस्थित होते.