Home महाराष्ट्र मान्सूनपूर्व तयारीचा गल्लोगल्ली आढावा; ॲड. मिथिलेश केंद्रे यांची नागरिकांशी थेट संवाद मोहीम

मान्सूनपूर्व तयारीचा गल्लोगल्ली आढावा; ॲड. मिथिलेश केंद्रे यांची नागरिकांशी थेट संवाद मोहीम

194

▪️“निवडणुकीनंतरही पायदळी फिरत नागरिकांच्या दारात पोहोचणारे नेतृत्व; अपेक्षांचा आलेख उंचावला” 

गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.30मे):-मान्सून तोंडावर आला असताना गंगाखेड शहरातील मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे यांनी प्रत्यक्ष गल्लोगल्ली फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरापासून प्रभाग क्रमांक ९, ६, ४ आणि १ मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत विविध प्रश्नांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

तुंबलेल्या गटारी, नाल्यांची सफाई, डागडुजीची प्रतीक्षा असलेले रस्ते, पाणीपुरवठा लाईनमधील अडचणी, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा तसेच इतर नागरी समस्यांची पाहणी करून त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी शहरभर विविध उपक्रम राबवत पायदळी फिरून नागरिकांशी थेट संपर्क साधणाऱ्या ॲड. केंद्रे यांच्या कार्यशैलीची आठवण या निमित्ताने पुन्हा ताजी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. शहरातील अनेक भागांत प्रत्यक्ष भेटी देत समस्यांचा आढावा घेणारे ते सध्या पहिले गटनेते असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत असून, त्यामुळे त्यांच्या कार्याबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत.

दुसरीकडे नगरपरिषदेच्या कारभारात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध गटांमधील राजकीय कुरघोड्यांच्या चर्चांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पर्यायी व्यवस्था उभारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

या पाहणी मोहिमेत सुनील चौधरी, अजीज खान, चंद्रकांत खंदारे, साबेर शेख, दिलीपकुमार सारडा, गोविंद अय्या यांच्यासह नगरसेवक, पालिका अधिकारी, विभागप्रमुख आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.