Home महाराष्ट्र उमरखेड येथील शहीद भगतसिंग न.प मराठी शाळा क्र. 2 येथे प्रवेशोत्सव मोठ्या...

उमरखेड येथील शहीद भगतसिंग न.प मराठी शाळा क्र. 2 येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

186

(वर्ग एक ते पाच च्या विद्यार्थी, विद्यार्थिनी शालेय पुस्तके गणवेश शूज मान्यवरांच्या हस्ते वाटप)

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.24जून):- दिनांक 23-06-2025 रोजी स्थानिक नगर परिषद उमरखेड अंतर्गत असलेली शहीद भगतसिंग नप मराठी शाळा क्र 02 उमरखेड येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 प्रसंगी उमरखेड नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अनिल नरवाडे, उपाध्यक्ष शैलेश ताजवे व व्यवस्थापन समिती चे सदस्य सिद्धार्थ दिवेकर, पत्रकार स्वरांजली वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे अनिल नरवाडे पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये नविन प्रवेशीत 103 विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक,बूट तथा गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनील कवडे सर तर आभार अंकुश राजे सर यांनी मानले.

प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड सर, विजय सूर्यवंशी,अंकुश राजे, कु. अंजली राजपूत, सुनील कवडे सर, श्री विकास गिरी सर,लक्ष्मीकांत मुटकुळे, सौ.रंजना बारे मॅडम, सौं पोंगाने मॅडम, श्रीमती वानखेडे मॅडम, सौं. सोनाळे मॅडम, सौं येलकर मॅडम, सौं सोनोने मॅडम, सौं.बसवंते मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले व प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.