Home चंद्रपूर अस्मानी संकटात व सुलतानी लंपटात शेतकरी बेजार-पीकविमा,कर्जमाफी फक्त गाजर

अस्मानी संकटात व सुलतानी लंपटात शेतकरी बेजार-पीकविमा,कर्जमाफी फक्त गाजर

42

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.8जून):-अस्मानी संकट, नापिकी, शेतमालाला कवडीमोल भाव, गगनाला भिडलेली महागाई, सरकारने अवलंबिलेल्या कुटनीतीने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

  सरकारी तिजोतीतून पीक विमा कंपन्यांना सरकारने पैसा भरून शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विम्याच दोन वर्ष गाजर दाखवलं, त्यामुळे सरकारने पीक विमा कंपन्याकडे तगादा लावून यंदापेक्षा कमी नापिकी झाली तरी दहापाचं हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन वर्षांपूर्वी टाकले होते.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो म्हणून आशा लागली परंतु १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा बंद करण्यात आला. कठीण काळात काही आधार मिळेल या आशेने या वर्षी शेतकऱ्यांनी ठरलेल्या दरानुसार स्वतः खिशातून हजारो रुपये विमा कंपन्याकडे भरून पीक विमा काढला परंतु यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन तर सावंगलच नाही लाख रुपये खर्च करून एक दाना सुद्धा काहींच्या घरात आला नाही. कापसाच्या पीकाच तर ५०% पेक्षाही कमी उत्पन्न आहे.विमा कंपन्या शेतकऱ्याच्या पीकविम्याचे करोडो रुपये लाटून दडून बसल्या आहे. तरी सरकार पीक कंपन्यांना मॅनेज झाल्यासारखं मूग गिळून गप्प आहे. 

    कर्जमाफीचही नुसतं गाजरचं दाखवलेलं दिसते, ३६ हजार करोड चे आकडे सगळे भ्रमित करणारेच वाटते. कारण हकीगत वेगळीच आहे, शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत कर्जमाफी जाहीर केली आणि नेमकी मेक “३० सप्टेंबर २०२५ या तारखेत मारून ठेवली. या तारखे पर्यंत थकीत असलेले कर्जदार असावे” अशी अट ठेवली.३० सप्टेंबर पर्यंत किती शेतकरी थकीत आहे तर नेमके चार दोन टक्के जे की मयत असेल किंवा अन्य कारणाने.

बरं मयत असणाऱ्या कर्जदाराचा फक्त मृत्यूचा दाखला घेऊन हे कर्ज माफ करणार नाही त्यातही त्याच्या कर्जाची हमी स्वतःवर घेणारा आप्त किंवा वारसाने स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारा शपथपत्र करून,अशा वारसाच्या नावे शेती असावी व त्या शेतीवर कर्ज नसावं,बिना कर्जाची फार्मर आयडी हवी. शेतीवर कर्ज नसलेला वारस त्या मयत शेतकऱ्याचा कर्जबोजा स्वतः घेणारा कुठे भेटेल बरं? शेती असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यावर पीक कर्ज असणारच यात कुणाचंही दुमत नसातांना अशा अटी लादल्या त्यामुळे हे मयत शेतकऱ्यालाही कर्जमाफी मिळणार नाही. बरं हे सरकार २०१९ च्या पूर्वीच्या थकीत कर्जदाराला कर्जमाफी नाही म्हणतात बहुतांश हे हयात नसलेलेच शेतकरी आहे. यांच्या अटीनुसार असा शेती असून कर्ज नसलेला कोण वारस मयत शेतकऱ्याला मिळेल बरं या वरून मयत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळेल याची शाश्वती नाही.

 हयात शेतकऱ्याला ३१ मार्च च्या आत काहीही करून गाय बैल शेळ्या मेंढ्या बायकोच्या गळ्यातलं विकून पीक कर्ज भराव लागते तरच पुढील हंगामासाठी कर्ज मिळून त्याची शेती होऊ शकते त्यामुळे ९८/९९ टक्के शेतकरी हे नियमित कर्ज भरणारेच आहे त्यात त्यांना या दोन लाखाच्या कर्जमाफीचा किती लाभ होणार बरं ? खुप तर नियमित कर्जदाराला पन्नास हजाराच अनुदान सरकार देईल , पण दोन लाखाचा मात्र गाजावाज्या ह्या सरकारकडून होणार,कर्जमाफी जाहिरातीवर शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या रकमपेक्षाही जास्त खर्च हे करणार! उदधोगपतीच्या अरोबो खरोबो कर्जमाफीची मात्र कुणाला भनक सुद्धा लागू देणार नाही अशाप्रकारे रात्रंदिवस कष्ट उपसून अत्यल्प दरात जनतेची भूक भागवणाऱ्या अशा या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची हे सरकार थट्टाच करणार हे मात्र नक्की ! सरकारच्या अशा कुटनितिमुळे शेतकरी पुरता अस्मानी सुलतानी संकटात फसला असल्याचे सगळीकडे चित्र दिसून येत आहे.