Home महाराष्ट्र प्रा. डॉ. प्रकाश वाघमारे यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव

प्रा. डॉ. प्रकाश वाघमारे यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव

36

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो’-8698456515

गंगाखेड(दि.5जून):-येथील मूळ रहिवासी असलेले नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश संभाजी वाघमारे यांना दि. ४ जून २०२६ रोजी “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर जि. अहिल्यानगरच्या वतीने संविधान अमृतमहोत्सवा निमित्या ॲड. संघराज दादासाहेब रुपवते (जेष्ठ विधी तज्ञ), मा. प्रा. मुकुंद भारसाखळे (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला), मा. बाळासाहेब थोरात (मा. महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य), डॉ. किरण लहामटे (आमदार, आकोले विधानसभा), डॉ. रविंद्र घोसाळे (अध्यक्ष, तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर ) या मान्यवरांच्या हस्ते संगमनेर या ठिकाणी प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ. प्रकाश वाघमारे हे गेली तीस वर्षा पासून नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर येथे अध्यापनाचे काम करतात. शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक, धार्मिक, साहित्यिक व प्रबोधनात्मक कामात ही ते हिरीरीने काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर यांनी त्यांना हा सन्मानाचा पुरस्कार बहाल केला. त्यांना यापुर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरवीण्यात आले आहे.

त्यात वामनदादा कर्डक पुरस्कार, धम्मभुषण पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, राजर्षी शाहु महाराज शिक्षक रत्न पुरस्कार. प्रा. डॉ. प्रकाश वाघमारे हे महाराष्ट्र भर बुध्द, छ. शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, राजर्षीशाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यावर विनामानधन पस्तिस वर्षापासून व्याख्याने देतात. गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक साहित्याची मदत करतात. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्रीशिक्षण इत्यादीवर प्रबोधन करतात. ते पीएच. डी. चे संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्राध्यापकांना पीएच. डी. ची पदवी प्राप्त झाली आहे. काही विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत.

त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच मुंबई व अमरावती विद्यापीठावर एम. फिल व पीएच. डि. चे संशोधक तज्ञ म्हणून हि कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवा बद्दल मित्र, विद्यार्थी,नातेवाईक यांच्या कडून अभिनंदन होत आहे.