

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.2ऑगस्ट):-शोषित पिढीत समाजाच्या व्यथा कथेच्या, कवितेच्या, पोवाड्याच्या, कादंबरीच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर मांडणारे साहित्यिक डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती पुसद तालुक्यातील इसापूर (धरण )येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. के. थोरात, सरपंच अमजद खान पठाण, उपसरपंच बी. सी थोरात, शेंबाळपिंपरी पोलीस पाटील बापूराव कांबळे, जी. एन कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम सरपंच अमजद खान पठाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे नगर फलकाचे अनावरण करण्यात आले.व प्रमुख व्याख्याते शिलानंद पडघने यांनी आपल्या व्याख्यानातून आणि मनोगतातून अण्णाभाऊच्या साहित्य बरोबरच जीवनशैलीवर प्रकाश टाकला.
यावेळी माजी सरपंच कैलास नाईक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबू भाई, शेंबाळपिंपरी माजी तंटामुक्ती अध्यक्ष वाहूळे, जनार्धन खंदारे अनमोल ढोले, शेख लियाखत, देवानंद ढोले, अरविंद खंदारे, राज थोरात, संजय थोरात, जयंती उत्सव समितीचे विलास पडोळे, कैलास रणखांब, कैलास पडोळे, गजानन पडोळे, सदाशिव ससाणे, नारायण रणखांब, संतोष रणखांब, विजय गजभार, रवी गजभार, अनिल ससाणे, सुरज पडोळे, आकाश पडोळे, किसन पडोळे तसेच बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शशांक खंदारे यांनी तर आभार विलास पडोळे यांनी मानले.



