

संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489
भंडारा -प्रबोधनकार महाराष्ट्राचे विद्रोही ख्यातनाम गायक साकोली तालुक्यातील एकोडी गावचे रहिवासी असलेले मनोज कोटांगले यांचे आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 ला सकाळी 10.30 वाजता रोडगे हॉस्पिटल भंडारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
मनोज कोटांगले हे बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकरी, कांशीरामजी, पुरोगामी, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे विद्रोही क्रांतिकारी अभ्यासक कवी, गायक, प्रबोधनकार प्रतिभावंत प्रबोधनकार कला, साहित्य संघाचे संचालक होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी, सांस्कृतिक चळवळीची फार नुकसान झालेले आहे हे कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या अंत्यविधी 2 आगस्ट 2025 ला सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरून त्यांचे प्रेत यात्रा निघेल. त्याचप्रमाणे आज रात्री 9 वाजता प्रबोधनकार क्षेत्रातील कलावंतांचा कार्यक्रम सुद्धा त्यांच्या निवास त्यांनी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या निधनाबाबत सामाजिक ,साहित्यिक, पत्रकार, प्रबोधनकार, राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे.



