पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य व ताणतणाव शिबिरास सुरुवात

102

 

संजीव भांबोरे
भंडारा -पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशन सिहोरा येथे पोलीस अधिकारी ,अमलदार, होमगार्ड व त्यांचे कुटुंबीय यांच्या करिता निशुल्क आरोग्य शिबिराचे व ट्रेस मॅनेजमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .पोलिसांच्या कामाची वेळ, अनिश्चित असलेल्या त्यांना रात्र दिवस ड्युटी करावी लागते. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन विविध शारीरिक व मानसिक आजारास बळी पडावे लागते .या अनुषंगाने सदर शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा व प्राथमिक आरोग्य केंद्र सिहोरा यांच्या सहकार्याने घेण्यात आले .सदर शिबिरात पोलीस अधिकारी अंमलदार व त्यांचे कुटुंबीय तसेच होमगार्ड यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच त्यांचे औषध, उपचार व शारीरिक तपासण्या करून मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. सदर शिबिरामध्ये डॉ. भगत मानसोपचार तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांनी ट्रेस मॅनेजमेंट बाबत खूप चांगले मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात पोलीस निरीक्षक विजय कशोधन,
सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे ,पोलीस उपनिरीक्षक पटले कल्याण शाखा भंडारा यांनी विशेष सहकार्य केले .अशा प्रकारच्या शिबिरामुळे पोलीस दलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेता येते. तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळते.