Home महाराष्ट्र प्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांना, ” गझल अंकुर पुरस्कारा”ने सन्मानित

प्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांना, ” गझल अंकुर पुरस्कारा”ने सन्मानित

260

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) 

गंगाखेड(दि.2एप्रिल):-दि.३१मार्च रोजी राणीसावरगाव येथील प्रसिद्ध कवी,गझलकार आत्माराम जाधव यांना स्व.लक्ष्मण जेवणे स्मृती निमित्त प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांच्या तर्फे दिला जाणारा २०२५ चा “गझल अंकुर पुरस्कार ” प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळा प्रसंगी माजी मंत्री व बच्चूभाऊ कडू,सौ.प्रगतीताई नितीन देशमुख,प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांच्या उपस्थितीत आदर्श ग्राम बेलोरा जि.अमरावती येथे संपन्न झाला.

शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व रोख रक्कम 5000 रू असे पुरस्काराचे स्वरूप होते.

आत्माराम जाधव हे मागील काही वर्षांपासून सातत्याने दर्जेदार कविता,गझल लिखाण करत आहेत.उत्कृष्ट सादरीकरणाने त्यांनी महाराष्ट्रभर आपला नावलौकिक वाढवला आहे.त्यांच्या त्यांच्या लिखाणाची दखल घेवून प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांनी पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.या पुरस्काराबद्दल आत्माराम जाधव यांचे सोशल मिडिया तसेच ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन होत आहे.