ढवळकेवाडी येथील सवारीचे नाळ आणि दानपेटी फोडून चोरी

66

🔺 अज्ञात चोरट्याने चौऱ्याहत्तर चारशे रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.24एप्रिल):-तालुक्यातील ढवळकेवाडी येथील राजू मनोहर राठोड यांच्या घरातील मोहरम ताजिया निघणाऱ्या सवारीचे चांदीचे नाळ व दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी चौऱ्याहत्तर चारशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची तक्रार (दिनांक 22 एप्रिल) रोजी पोलीस ठाणे गंगाखेड येथे दिली आहे.

अधिक माहिती अशी ढवळकेवाडी येथील राजू मनोहर राठोड हे कामानिमित्त हैदराबाद येथे राहतात राजू राठोड यांना भेटण्याकरीता आई वडील दिनांक 12 एप्रिल रोजी हैदराबाद येथे गेले होते व दिनांक 22 एप्रिल रोजी आई वडिलांसह राजू राठोड ढवळकेवाडी येथे परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले घरातील लोखंडी पेटीचा कडी कोंडा व कुलूप तोडून चोरी झाल्याचे राठोड यांच्या निर्देशनास आले अज्ञात चोरट्याने राजू राठोड यांच्या घरातील मोहरम ताजिया असलेल्या सवारी वरील आठ हजार चारशे रुपये किमतीचा 21 तोळ्याचा चांदीचा टोप, दोन हजार रुपये किमतीचा पाच तोळ्याचा चांदीचा छोटा टोप, चाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे एक तोळा असे 100 नाळ, दानपेटीतील रोख 24000 रुपये असे एकूण 74 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

राजू राठोड यांनी तात्काळ गंगाखेड पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करून अज्ञात आरोपीवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे राजू राठोड यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस ३०५ ए 331-3, 331-4 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदरील घटनेचा तपास गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे हे करत आहेत