राष्ट्रसंत तुकडोजी कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

380

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.6मे):-गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील नुकत्याच लागलेल्या ( Hsc)एच.एस.सी. परिक्षा २०२५ च्या परीक्षेत विद्यार्थ्यानी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 70.55 टक्के लागलेला आहे त्यात वाणिज्य शाखेचा निकाल 79.62% तर कला शाखेचा निकाल 56.94% लागलेला आहे कला शाखेमधून कु. साक्षी संजय मेश्राम हिने 80% गुण प्राप्त करून प्रथम कु. वैशाली गंगाधर रोकडे 74.33% द्वितीय तर श्री साहिल राजू इंगोले याने 72% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य शाखेमधून वेदांत खेमराज थुटे 75.33 % गुण प्राप्त करून प्रथम श्री आदित्य सुरेश नवघरे व सुवर्णा सुनील उरकुडे यांनी

 74.83 % गुण प्राप्त करून द्वितीय कु. प्राची विकास केमये हिने 74.17% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतून 02 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत 29 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 55 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 41 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले सचिव विनायकराव कापसे , संस्थेचे सर्व सदस्य कार्यकारी प्राचार्य कॅप्टन डॉ. प्रफुल्ल बन्सोड कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.राकेश कुमरे प्रा.रोशन कुमरे प्रा.गुणवंत वाघमारे प्रा. अमोल मालके प्रा. गजानन चव्हाण प्रा. दुर्योधन रोकडे प्रा. किशोर चटपकार प्रा.अमर ठवरे प्रा.रीना गाडगे प्रा. नीलिमा तुराणकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.