Home Breaking News अती मोह नडला-वीस रुपयांसाठी लाखों केले पसार

अती मोह नडला-वीस रुपयांसाठी लाखों केले पसार

289

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.1जुन):-जे आपले नाही त्याच्या नादात आपले गमावून बसण्याची राजुरा येथील चोरीची घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजुरा शहरातील अत्यंत वर्दळीच्या व मुख्य महामार्गाला लागून असलेल्या बँक ऑफ इंडिया समोरून भर दुपारी राजुरा येथील रहवासी बंडू देठे यांच्या दुचाकितून तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये चोरांनी लंपास केले. शनिवार (दि.३१ मे) दुपारी बारा वाजता बंडू देठे हे बँक ऑफ इंडिया मध्ये शेतीच्या कामासाठी एक लाख चाळीस हजार रुपये रक्कम काढून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले.

बाहेर असलेल्या स्वतच्या दुचाकीच्या पुढील बॅग मधे ती पिशवी ठेवली. क्षणातच पाळत ठेवून असलेला युवकाने वीस रुपयांची नोट खाली पाडून तुमचे पैसे खाली पडले असे सांगितले यावर देठे यांनी गाडीवरून उतरत ती नोट घ्यायला गेले तेव्हढ्यात त्या चोरट्याने गाडीतुन रक्कम काढली व आपल्या साथीदारासोबात दुचाकीने पसार झाला. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात चित्रित झाली असून राजुरा पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. ” नजर हटी दुर्घटना घटी ” असे आपण नेहमीच एकत व बघत आलो आहोत तरीही अती मोह नडला आणि चक्क वीस रुपयांच्या नादात स्वतःचे लाखो रुपये गमावून बसण्याची वेळ देठे यांच्यावर आली. 

राजुरा शहरात प्रामुख्याने शनिवार आठवडी बाजारात व अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अश्या चोरीच्या घटना नेहमीच घडतात. मोबाईल, दागिने, रोख रक्कम चोरी जाण्याच्या घटना वाढतच आहे. त्यामुळें या संपूर्ण ठिकाणी पोलिसांनी गुप्त बंदोबस्त लावुन चोरांच्या मुसक्या आवळण्याची व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता आहे.