Home महाराष्ट्र जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून 2025 वर्षाच्या अभियानाला सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून 2025 वर्षाच्या अभियानाला सुरुवात

309

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5जून):-जागतिक विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून (दिनांक 5 जून गुरुवार) रोजी गोदावरी स्वच्छता अभियान व गंगाखेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण 2025 या वर्षाच्या अभियानाची सुरुवात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या हस्ते श्री गोरक्षण संस्था येथे वृक्षारोपण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी स्वच्छता अभियान व गंगाखेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.याप्रसंगी श्री गोरक्षण संस्थानचे सचिव मिरखे, संचालक देवानंद जोशी यांची उपस्थिती होती.

दरवर्षी जगभर ५ जून रोजी जागतिक वृक्षारोपण दिन साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. 

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. याच अनुषंगाने गंगाखेड येथे गोदावरी स्वच्छता अभियान व नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी गोदावरी स्वच्छता अभियान प्रमुख ॲड.राजू देशमुख, माणिकराव मुंडे,प्रसाद कल्याणी, बालाजी डमरे, प्रतिमाताई वाघमारे, ज्ञानेश्वरी लटपटे,पूजा बंग,प्रा.उमाकांत साकोळकर,पुजा कस्तुरकर,श्वेता आचार्य,पद्माकर पदमवार,कृष्णा ईंगळे,आर.एफ.राठोड,बंडु ओझा सर्व स्वच्छता दूतांसह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*चौकट*

गंगाखेड वृक्षारोपण अभियान अंतर्गत शहरात प्रथम टप्प्यात १००० विविधता पुर्ण वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे.त्यात लिंब,पिंपळ,वड,पळस, करंजी, उंबर सह नदी वड्या या काठावर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी गोदावरी स्वच्छता अभियान,नगर परिषद गंगाखेड,सा गंगाखेड केसरी, नवदुर्गा महिला मंडळाच्या सयूंक्त सहभागातून होणार आहे.