ॲड.अरुण ठाकरे एक आष्टापैलू व्यक्तिमत्व

24

साधनदाता प्रभू सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांच्या माध्यमातून मिळालेली शिकवण सांगते तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा तुम्हा परस्परे परम प्रीती होवावी.

याच कारणाने. साधनदाता प्रभू सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांच्या माध्यमातून मिळालेली शिकवण पदोपदी आठवण ठेवून आपला प्रवास करत असताना अशीच धर्माच्या नात्याने मोठ्या भावाचे नात्याने सतत पाठीवर हात ठेवून मागे असलेल नाव म्हणजेच अमरावती निवासी माझे धर्म बंधू आदरणीय ॲड .श्री अरुण ठाकरे सर

         १५ जून हा आदरणीय ॲड. श्रीअरुण माणिकराव ठाकरे सरांचा जन्म दिवस.काय माहित नाही मात्र त्याच दिवशी माझा देखील जन्मदिवस हा १५ जून हा अगदी निव्वळ योगायोगचपरंतु काही नाती ही तुम्ही आम्ही नव्हे तर ही प्रभूच ठरवत असतात. अगदी त्याच न्यायाने माझी व सरांची फेसबुक सारख्या माध्यमातून ओळख झाली. ती ओळख इतकी दृढ झाली की सरांचे माझी अगदी जिव्हाळ्याचे नात प्रस्थापित झाले; परंतु आदरणीय ठाकरे साहेब यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी माझा ही जन्मदिवस असणे ही एक वेगळीच आनंददायी बाब; कारण साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी नुकतेच फेसबुक अकाऊंट सुरू केलं होतं. त्यात अनेक पंथीय मला फेसबुक फ्रेड या नात्याने जॉइंट होत असताना. माझी व सरांची ही मैत्री जोडली गेली. त्यावेळी त्यांचे बद्दल मी माझे श्रीगुरुजी आचार्य श्री वामनराज शास्त्री बिडकर तथा उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबा महानुभाव यांच्या व माझ्या मधील असलेलं नातं सराना माहीत होते.त्यातूनच आमची मैत्री दृढ होत गेली. त्याच सरांच व माझं मैत्रीचं नातं इतकं दृढ होत गेलं की, आज सरांचे कुटुंबातल्या सदस्यामध्ये माझ्या सारख्या एका सामान्य व्यक्तीची नोंद झाली हे मी माझं भाग्यच समजतो.

     कोण आहेत ॲड.अरुण ठाकरे. अरुण ठाकरे हे एक हाडाचे शेतकरी. ते अमरावती जिल्हा येथील एक महानुभाव पंथाचे अनुयायी. श्री प्रभू सॉफ्ट लिंक चे सर्व्हेसर्वा. अरुण ठाकरे आहेत उतम लेखक एक उत्तम शिक्षक, एक प्रतिथयश वकील, एक उत्कृष्ठ कलाकार, एक सुमधुर गायक एक उत्कृष्ठ संगीतकार, एक उत्कृष्ठ गझलकार, असे एकअष्टपैलू व्यक्त्तित्त्व म्हणजे ॲड.अरुण ठाकरे सर.

       ॲड.अरुण ठाकरे महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत. या सर्व गोष्टींचा मोठा अनुभव असताना ते अध्यात्मिक क्षेत्रात देखील मागे नाहीत.

पंथाच्या एका मोठ्या संस्थेचे सदस्य अर्थातच अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे मा.सदस्य.

         आयकर वकिलाच्या टॅक्स बार असोसिएशन या संघटनेत सलग चार वेळेला कार्यकारिणीत बिनविरोध निवड.अमरावती एस. टी . महामंडळात सारख्या अनेक संस्थामध्ये कायदे सल्लागार म्हणून काम करीत आहे.

सरांच्या माध्यमातून आतापर्यंत व्यावसायिक मार्गदर्शन करणारी सुमारे बारा पुस्तकांचे लेखन, संपादन व प्रकाशन करण्यात आले आहे.या सर्व गोष्टी कडे नजर फिरवत असताना सरांनी केलेल्या विविध विभागातील अभ्यासातून कायद्यांचे शिक्षण घेत असताना तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते पारितोषिक विजेते तज्ज्ञ आहेत.

त्यांचा सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांच्या माध्यमातून मिळालेली शिकवण अर्थातच ब्रम्हविद्या शास्त्राचे अभ्यासक आहेत. आणि या सर्व बाबी असताना ही अरुण ठाकरे हे अमरावती च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत प्रसिद्ध असलेलं अर्थातच परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेले ठिकाण अर्थातच ज्या ठिकाणी रुख्मिणी मातेचे हरण नव्हे तर उद्धार झालेला आहे ते ठिकाण अर्थातच माता खिडकी प्रसारात असलेल्या एकमेव श्री कृष्ण मंदिराचे सचिव.

         सरांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांचे माध्यमातून अनेक विद्यार्थी घडल्ली आहेत.

त्यांनी महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात आता पावेतो पेन्शन व आयकर विभागाच्या माध्यमातून अनेक विषयावर मार्गदर्शन म्हणून व्याख्यान दिलेली आहेत व आज ही देत आहेत.अशा वैविध्यतेने वलयांकित असलेले हे एक अवलिया व्यक्तिमत्व.

ज्यांना आपल्या ना पदाचा अभिमान ना आपल्या वयाचा बडेजाव.सरांनी या सर्व गोष्टीत काम करत असताना. राज्यातील तसेच पर राज्यातील दौरे करत असताना त्यांनी देशाबाहेर इतर देशात जाऊन देखील विविध विषयावर व्याख्यान दिलेली आहे त्या भागाची पाहणी करून तिथल्या अनुभवातून आपल्या राज्यातील नागरिकांना योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं ठाकरे सर या कारणाने देखील लोकाभिमुख झालेले आहे.

सरांच्या व माझ्या परिचयातून मला त्याच्या सोबत अनेक राज्यात जाण्याचा योग आला.

त्यातून अनेक पंथीय धर्म बंधूंच्या ओळखी झालेल्या आहेत. त्यांचे सोबत अनेक गोष्टी लिहू शकलो. मात्र त्याच्या परिवारात मी एक सदस्य म्हणून जोडलो गेलो हे माझं भाग्यच.

सरांच्या अकलानातून व अभ्यासातून लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकातून संपूर्ण राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन होणारी ग्रंथ सामुग्री प्रकाशित झाले आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तक आहे आजही राज्यातील प्रत्येक ग्रंथालयात आपणास वाचनास मिळू शकतील इतकी प्रसिद्ध लेखन सामुग्री सरांनी दिलेली आहे.अशा या जेष्ठ धर्म बंधूचा जन्म १५/०६/१९५६ रोजी अमरावती येथे झाला.

त्याच्या ह्या वाढत्या वयासोबत त्याच्या कार्याचा ही आलेख असाच दिवसेंदिवस वाढतच जावा हीच खरी आमच्या संपूर्ण परिवाराकडून मनापासून शुभेच्छा. सरांच्या ह्या परिवारात देखील सरांनी आपल्या कुटुंबात सर्वच सदस्य ही विविध क्षेत्रात निपुण केली आहेत.त्यात सौ.ठाकरे ताई ह्या देखील एक शिक्षका असून त्यांनी देखील आपल्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवून त्याच्या कार्यात कार्यरत सराना देखील वेळोवेळी सहकार्य करत आलेल्या आहेतच.सराना एक मुलगी व एक मुलगा असा परिवार.मुलगी खारघर नवी मुंबई येथील भारतीय विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर तर जावई डॉ. गजाननराव ठोकळ पनवेल येथील पिल्लई इंजिनियरिंग कॉलेजला एच ओ डी आहेत.

ठोकळ परिवारातील सरांचा नातू हा देखील हुशार अभ्यासू असल्याने नातू क्षितिज IIT प्रवेशाच्या वाटेवर आहे.

        सरांचा मुलगा ॲड.अमोल अभियंता असताना वकील ही झाला . वकील होऊनही वडिलांच्या आयकर क्षेत्रात काम करण्याचा वारसा अखंड सुरु राहील यासाठी स्वतः देखील आयकर सल्लागार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत असताना ते अमरावती विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची स्नुषा ह्या देखील वकील असून त्या नोटरी असताना इतर संस्थांच्या देखील विविध पदांवर कार्यरत आहेत.

      या ठाकरे कुटुंबाने नुकतीच अमरावती येथे अद्यावत अशी व्यापारी संकुलाची उभारणी करून त्यात वकील कर सल्लागार केंद्र तसेच इतरही अनेक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज असे कॉर्पोरेट ऑफिस उघडले आहे.ह्या दोन पिढ्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सरांच्या दोन्हीही नाती ह्या देखील अतिशय हुशार व चाणाक्ष नजरेतून पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी वाटचाल करत आहे. दोन नाती ह्या अजून शिक्षण घेत असताना त्या देखील आजोबांचे संस्कारातून अतिशय सुंदर आपली शैक्षणिक वाटचाल करीत आहेत.

        हे कुटुंब व्यावसायिक दृष्टिकोनात जर वावरत असेल तरी अतिशय धार्मिक व प्रभू श्रीचक्रधर महाराज यांच्या माध्यमातून मिळालेली शिकवण पदोपदी आठवण करून आपला प्रवास करत आहे.प्रभूच्या प्रत्येक वचनाला कृतीतून दाखवून देण्यासाठी आचरण हा एक मूलभूत भाग कधीच विसरत नाही. अशा ह्या सुसंस्कार देणाऱ्या ठाकरे सरांचा यावर्षीचा हा होणारा जन्मदिवस माझ्या साठी नव्हे तर आपल्या सर्वांना एक आदर्श व मार्ग दाखविणारा आहे .

     अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या माझ्या धर्म बंधू सराना मनापासून शुभेच्छा. ॥

✒️सुरेश सरूबाई देवराम डोळसे(नाशिक)मो:-९४२२७६२९१४