Home महाराष्ट्र शिरताव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालचमुंचा दिंडी सोहळा उत्साहात संम्पन्न

शिरताव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालचमुंचा दिंडी सोहळा उत्साहात संम्पन्न

123

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.6जुलै):-माण तालुक्यातील शिरताव येथे पहिल्यांदाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा शिरताव व अंगणवाडी यांच्या वतीने पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बालचमुंचा वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. 

यावेळी शिरताव ग्रामपंचायत सरपंच हणमंत विरकर , सदस्य शिरताव सुनील मदने तसेच पालक ,ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 

प्रथम शिरताव येथील शाळेच्या प्रांगणात पालखी व विठ्ठल रुक्मिणी च्या प्रतिमेचे पूजन सरपंच हणमंत विरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर विद्यार्थी बरोबर पालक ग्रामस्थ ,महिला दिंडीत सहभागी झाल्या .विविध अभंग,भजन व जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात दिंडी सोहळा गावातील प्रमुख मार्गवरून नेण्यात आला ,जाताना वाटेत अनेक कुटुंबातील महिलांनी दिंडीचे व विठ्ठल व रुक्मिणी चे पूजन केले.सर्वत्र आनंदी वातावरण होते.

यावेळी कोंडीबा शिंगाडे व अमृत लुबाळ यांनी मुलांना खाऊ वाटप केले.सरपंच विरकर यांनी सर्वाना महाप्रसाद दिला. विशेषतः यावेळी महिलानि स्वयंस्फुर्ती ने फुगडी व अन्य गीत गायन करून सर्वांची वाहवा मिळविली.

  यावेळी ज्ञानेश्वर लुबाळ, भागवत लुबाळ, पांडुरंग, लुबाळ, विनोद लुबाळ,राजेंद्र लुबाळ सर जालिंदर शिंगाडे, कोंडीबा शिंगाडे, सुधीर शिंगाडे, सुनील चव्हाण, समाधान लुबाळ, महादेव बनसोडे, काजल चव्हाण अंगणवाडी सेविका शिरताव, शारदा लुबाळ अंगणवाडी सेविका चंदनशिवे वस्ती, मनिषा विरकर मदतनीस, वैशाली लुबाळ माजी उपसरपंच शिरताव, मनिषा मदने, वैशाली मदने, वर्षा मदने, सुरेखा लुबाळ, मयुरी भिसे, सोनाली खळवे, सुजाता शिंगाडे, शशिकला लुबाळ, शिल्पा निकाळजे, अक्षता निकाळजे, पुष्पा शिंगाडे, रावसाहेब चव्हाण, लक्ष्मी चव्हाण ,मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे,शिक्षक अनिल पाटोळे उपस्थित होते.