

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.15जुलै):-ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी पांडुरंग खाडे या इस्माने शेतात मका खुरपाण्यास गेलेल्या महिलेचा उसने पैसे मागन्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली इसमाविरुद्ध म्हसवड पोलीस स्टेनशमला गुन्ह्यांची नोंद करण्यात आली
पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14.7.2025 रोजी दुपारी 3.45 वाजे दरम्यान मौजे ढाकणी तालुका -माण जिल्हा- सातारा गावचे हद्दीत साबळयांचे शेत नावचे शिवारात आमचे मालकीचे शेतात मका खुरपणी करीत असताना मल्हारी पांडुरंग खाडे यांनी त्याचे चार चाकी गाडीने तेथे येवुन उसने घेतलेले पैसे परत देण्याच्या कारणावर जवळ बोलावून घेऊन महिलेचा विनयभंग केला आहे.
जवळ असलेले 2000/- रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेला असल्याची तक्रार महिलेने दिली आहे सदर इसम जावली पंचायत समितीचा ग्रामसेवक असलेचे बोलले जातं आहे सदर घटनेचा तपास स. पो. नि. श्री. अक्षय सोनवणे करत आहेत



