

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.29जुलै):-गंगाखेड परळी रोड वरील माऊली या हॉटेल वर 27 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गंगाखेड पोलीनी छापा टाकून 23 वर्षीय महिलेची सुटका करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलासह चार पुरुषांना ताब्यात घेतले असून रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड परळी रोड वरील या परिसरातील माऊली हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांना मिळाली असता डमी ग्राहक पाठवून शहाणीशा करण्यात आली व पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सपोनी आदित्य लोणीकर,सपोनी दीपाली गिते,सपोनी शिवाजी सिंगणवाड, पोउनी व्यंकट गगलवड,पोउनी राहुल लोखंडे,पोलीस अंमलदार स्नेहल जिंकलवाड, परसराम परचेवाड दत्तराव चव्हाण, सतीशकुमार पांढरे यांनी रविवारी सायंकाळी हॉटेल वर छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या उर्मिला शिवाजी देवकते, हॉटेल मधील बालाजी नंदू आडे, कृष्णा सुरेश गयाळ, नारसीराम नेथीराम चौधरी, मंगेश आत्माराम व्हावळे, यांना तब्यात घेऊन पोउनी राहुल लोखंडे यांच्या फिर्यादी वरून हॉटेल जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालक सहित ताब्यात घेतलेले यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.



