प्रा. सुरेश हुमणे आचार्य पदवी ने सन्मानीत

94

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.4ऑगस्ट):-शेडेगांव (कॅम्पस) येथील आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथील ग्रंथपाल व सहा. प्राध्यापक सुरेश हुमणे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचे परिपत्रक क्र. (रा. तु. म. ना. वि. /पी.एच.डी. (सेल)/४/८९२ दि. ३१ जुलै व्दारा आचार्य पदवी बहाल करण्यात आली. 

  त्यांनी महाराष्ट् राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील ग्रंथालयाचे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानावर सखोल अभ्यास केला. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय “युज ऑफ आयसीटी ईन सोशियल वर्क्स कॉलेज लायब्ररीज इन महाराष्ट्र: ऐ स्टडी” असा आहे. त्यांनी आपले संशोधन डॉ. सत्यप्रकाश एम. निकोसे, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा उपयोग समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांना होणार असुन सामाजिक संशोधन क्षेत्रातही याचा उपयोगी होईल.

   आपल्या यशाचे श्रेय त्यांनी संस्थाध्यक्ष स्व डॉ. चंदनसिंग रोटेले, केदारसिंग रोटेले (उपाध्यक्ष), संस्थेच्या सचिव व माजी सिनेट सदस्या, रा. तु. म. ना.विद्यापीठ, नागपूर सौ. किरणताई रोटेले तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर (लुंगे) यांना दिले आहे. 

आपले संशोधनकार्य पूर्ण करण्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय, चिमुर येथील माजी प्राचार्य डॉ. वर्गीस ॲन्थोनी, यशवंत महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अंजली महेश गौरी, सौ. ज्योती हुमणे, आ.स. महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. सुदर्शन खापर्डे यांचे त्यांना मार्गदर्शनपर प्रोत्साहन मिळाले.

आचार्य पदवी मिळाल्याबद्दल डॉ. मंगला हिवराळे, रा.तु.म.नागपूर, डॉ. सुनिल पुनवटकर वंसतराव नाईक शासकीय महाविद्यालय नागपूर, प्रा. सुधीर गोटे, रमेश मोटघरे (पुसद) यांनी त्यांचे अभिनंदन केले.