Home महाराष्ट्र प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णाभाऊंच्या जातीअंताच्या विचारांची गरज : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे...

प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णाभाऊंच्या जातीअंताच्या विचारांची गरज : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार उत्तमदादा कांबळे आणि माजी आमदार राजीव आवळे यांना प्रदान

184

 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वतःच्या परिस्थितीमध्ये जातीव्यवस्था टोकदारपणे घट्ट करण्याचे काम सुरू आहे. धर्मांध भूमिका घेऊन सरकार धर्माधर्मामध्ये, जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे कटकारस्थान करत आहे. छोट्या छोट्या जाती विभक्त करून त्यांच्यातही आपापसात भांडणं लावण्याचे डावपेच आपल्याच काही समाजद्रोही लोकांना हाताशी धरून आखले जात आहेत. अशा काळात त्यांना व प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णाभाऊंच्या जातीअंताच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
ते मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान आणि लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शोभा चाळके यांच्यासह प्रा. किसनराव कुराडे, अनिल म्हमाने, डॉ. श्रीपाद देसाई, ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, अब्राहमबापू आवळे, मंगलराव माळगे, डॉ. कपिल राजहंस, बाळू वाशीकर, विश्वासराव तरटे यांनी मनोगते व्यक्त केली.
या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजीव आवळे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शंकर पुजारी, संजय मुळे, आनंतराव घोगरे, राजेंद्र पिंपळे, डॉ. धनंजय साठे, अ‍ॅड. मारुती व्हनखंडे, लालू गुजलवाड, श्रीपाद पटवर्धन, रमेश भालेराव, नामदेव नागटिळे, प्रमोद साठे, डॉ. वैशाली गुंजेेकर, विधाताभाऊ आहिरे, जितेंद्र चोकाककर, डॉ. दशरथ रसाळ, डॉ. संदीप वाकडे, संजय कांबळे, जतीन वाघमारे, सुशांत पाटील, उमेश मेश्राम, रूपचंद फुलझेले, जया बागुल, भागवत मसने, विजयकुमार भुजबळ, आबासाहेब साबळे, सुरेंद्र घुडे, सातापा कांबळे, प्रेरणा शेजवळ, सौरभ जगताप, संदीपभाऊ वानखेडे, प्रा. बाळू गायकवाड, निशांत आवळेकर, अ‍ॅड. संतोष शिंदे, बळीराम रणदिवे, मोहनभाऊ देवतळे, सुनंद भामरे, प्रल्हाद बट्टेवार, चंद्रकांत पांढरे, रमेश कांबळे, शैलेश गायकवाड, सुधामती लोखंडे, अनिल काजवे, शेखर कांबळे आदी मान्यवरांना लोकशाहीर अण्णा भाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रा. प्रकाश नाईक यांचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना… या विषयावर जाहीर व्याख्यान झाले.
निर्मिती प्रकाशन, प्रकाशित प्रा. प्रकाश नाईक लिखित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना आणि कवी, लेखक, प्रकाशक आणि दिग्दर्शक अनिल म्हमाने लिखित संवेदनशील साहित्यिक अण्णा भाऊ या दोन पुस्तकांचे यावेळी प्रकाशक करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. करुणा विमल यांनी सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर तर अर्हंत मिणचेकर यांनी आभार मानले.