

✒️सांगोला(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सांगोला(दि.11ऑक्टोबर):- शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावरती अतिशय अनमोल असे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. रुपनर पी.जे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल किती महत्वाच्या आहे हे अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच त्यांनी पुढे बोलताना असे सांगितले की सॉफ्ट स्कीलचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनाचे जे गोल ठरवले आहे ते पूर्ण करू शकता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सॉफ्ट स्किल कमिटीचे चेअरमन प्रा. धनाजी भानवसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख, संस्थेचे सचिव म. विठ्ठलराव शिंदे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.सौ. सुर्यवंशी मॅडम यांनी मानले आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.शिंदे डी.आर, प्रा.लवटे पी.एम व प्रा.कु. गोडसे डी.एन यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.







