

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.12ऑक्टोबर):-शहराची वाढती लोकसंख्या यामुळे एकाच पोलिस ठाण्यावर पडणारा ताण कमी व्हावा यासाठी गंगाखेड येथे ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती व्हावी यासाठी गंगाखेड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमाणी यांच्यावतीने अनेकवेळा मागणी करण्यात येत आहे नकीच आपल्या मागणीचा विचार करून गंगाखेड येथे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटले ते (दिनांक 11 ऑक्टोबर शनिवार) रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते.
येथील पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उमाप यांनी म्हटले की नागरिकांच्या समस्या नोंदवून त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने मेसेज मार्फत फीडबॅक देण्यात येणार आहे महिला तक्रार निवारणासाठी भरोसा सेलची येथेच स्थापना करण्यात येईल अशा विविध समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याचे म्हटले बैठकीस उपस्थित असलेले परभणीचे अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील,पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नोंदऊन घेतल्या
आयोजित संवाद बैठकीस शहरातील शांतता समितीचे दगडूशेठ सोमानी, जावेद इनामदार,ज्ञानोबा अनंतवार, सचिन दहिवाळ,सुनिता घाडगे, गुणाबाई सोनवणे,सूर्यमाला मोतीपवळे,महादेव गीते,प्रा.डॉ.राजीव आहेरकर, अब्दुल अशपाक,जगदीश तोतला,संजय तापडिया,प्रतापसिंह ठाकूर,अमानुल्ला खान,विजय सावरगावकर,माधवराव ठवरे, नागेश केरकर यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील पत्रकार बांधवांची उपस्थिती होती







