

‘उत्तराध्यायन सूत्र’च्या ‘सभिक्षुक’, ‘ब्रह्मचर्य समाधी स्थान’ व ‘पाप श्रमण’ अशा १५ ते १७ अध्यायांपर्यंतचे विश्लेषण प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात सांगितले.
भिक्षु आणि भिकारी यांच्यात काय फरक असतो? याबाबत अधिक सांगताना महत्त्वाचा भेद स्पष्ट करून सांगितला गेला. भिकाऱ्याला याचक म्हणून हात जोडून भीक मागावी लागते. हे मागताना लाचारी असते व देणाऱ्याच्या चेहऱ्यावर काहीसा परोपकाराचा भाव असतो. भिक्षा घेणारा हा साधक असतो. त्याला काही देताना हात जोडून अहोभाव व कृतज्ञतेने भिक्षा दिली जाते. तीर्थंकर भगवान महावीर यांनी १५ व्या अध्यायात सांगितले. सोळाव्या अध्यायात ब्रह्मचर्य समाधी स्थान याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.
साधकांच्या साधनेत ब्रह्मचर्य व्रत हे मुख्य मानले जाते. शेताच्या सुरक्षेसाठी आपण ज्या प्रमाणे कुंपण घालतो, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य सुरक्षित राखण्यासाठी दहा समाधी स्थान सांगण्यात आलेले आहेत. यातील पहिले म्हणजे ‘स्थान विवेक’ आगम थोकड्यात उंदीर-मांजराचे उदाहरण दिले आहे. ‘वचन विवेक’, ‘आसन विवेक’ लिंबू व चिंच आणि अग्नी व तूप यांचे उदाहरण दिलेले आढळते. ‘दृष्टी विवेक’ नुकते डोळ्यांचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीने सूर्याकडे बघणे अशा पद्धतीने. ‘श्रवण विवेक’, ‘स्मरण विवेक’ म्हातारी दोन्ही परदेशी व्यक्ती व विषारी ताक हे उदाहरण सांगण्यात आले आहे. ‘सरस आहार विवेक’ विकार वाढवणारे भोजन करू नये, उणोदरी तप म्हणजे पोट भर न जेवता थोडे कमीच जेवण करावे.
‘शरीर विभूषा विवेक’ शरीराला नव्हे तर आत्मा सजवायला हवे, असा मोलाचा संदेश या प्रवचनात दिला गेला. ‘शब्द, रूप, रस, गंध विवेक’ या बाबत देखील सांगण्यात आले. ब्रह्मचर्य पालन करणारे साधक सर्वांसाठी वंदनीय ठरतात. १७ व्या अध्यायात ‘पापी श्रमण’ यावर सांगण्यात आले आहे. प्रमादयुक्त जीवन जगणाऱ्यांचे जीवन विष समान असते. त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यांची लक्षणे काय असतात यावर आजच्या धर्मप्रवचनात चर्चा केली गेली.
प्रवचनसभेत ‘उत्तराध्यायन सूत्र’च्या तोंडपाठ गाथा सादरीकरणात वैशाली खिंवसरा (१९ वा अध्याय), विनिता साबद्रा (२३ वा), सौ. चंचल लोढा (२५ वा अध्याय), सौ. मीनल समदडीया (२८ वा) यांनी उपस्थितांसमोर अध्यायांच्या गाथा सादर केल्या. (ऑक्टोबर १३: २०२५जळगाव, महाराष्ट्र)
✒️शब्दांकन:-किशोर कुलकर्णी(मो:-9422776759)







