Home नागपूर साथी सुजाता भोंगाडे यांना ‘बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार’

साथी सुजाता भोंगाडे यांना ‘बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार’

181

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.17ऑक्टोबर):-केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार’ यंदा नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या सुजाता भोंगाडे यांना जाहीर झाला आहे. रोख ५० हजार रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सन्मान रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता, अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलचे खुले सभागृह, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

                                            केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त अंजली वर्तक अध्यक्षस्थानी असतील. असंघटित व घरेलू कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीन दशकांहून अधिक काळ लढा देणाऱ्या तसेच गोसीखुर्द धरणग्रस्तांच्या विस्थापनाविरोधातील संघर्ष यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या सुजाता भोंगाडे यांच्या कार्याचा गौरव म्हंणून हा सन्मान दिला जात आहे. त्यांच्या प्रयत्नातून घरेलू कामगार कायदा २००८ मध्ये मंजूर झाला आणि घरेलू कामगार मंडळ स्थापन झाले.

 याशिवाय जल-जंगल-जमिनीचे प्रश्न,बाल कामगार, महिला सशक्तिकरण, बचत गट, शेतकरी शेतमजूरांच्या समस्या अश्या विविध विषयावरील कार्यशाळा, आंदोलनात त्यांच्या विशेष सहभाग असतो.