Home महाराष्ट्र रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून वैद्यकीय कार्य करणाऱ्या “नर्सिंगवाला” या सामाजिक...

रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून वैद्यकीय कार्य करणाऱ्या “नर्सिंगवाला” या सामाजिक संस्थेची उत्तुंग भरारी-अनिल जायभाये बीडकर

253

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 मुंबई(दि.18ऑक्टोबर):-रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे ब्रीद वाक्य असलेली “नर्सिंगवाला सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, परिचर्या संस्थेची ” वाटचाल हि अचंबित करणारी असून अथक परिश्रम व रुग्ण सेवेला तत्पर राहिली आहे.

मुंबई,पुणे शहरातील सर्व रुग्णांना तातडीची हॉस्पिटल स्तरावर आणि घरगुती स्तरावर रुग्ण सेवा पुरविण्यासाठी “नर्सिंगवाला” हि संस्था कोरोना 2020- 21 काळापासून कार्यरत असून अतिशय अल्प दरामध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये किंवा घरच्या घरी अती तात्काळ अँब्युलन्स, सर्व पॅथी चे अनुभवी डॉक्टर, अनुभवी नर्सिंग ऑफिसर्स, आरोग्य शिक्षण देणारे वरिष्ठ नर्सिंग शिक्षक,फिजियोथेरपिस्ट, पंचकर्म,मसाज, मालिश करणारे तज्ञ , स्वस्त मेडिसीन, तात्काळ रक्त तपासणी ,रक्त पुरवणारी यंत्रणा त्याबरोबरच डॉक्टर,नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांना रोजगार उपलब्ध करून देणारी मुंबई,पुण्यातील सर्वात मोठी वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक, परिचर्या संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. 

संस्थेचे विश्वस्त अजित गिते,रणजीत सर,रोहित मोराळे,विजय मिसाळ,विनीत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य अधिक गती येताना दिसत असून मुंबई , पुण्यातील रुग्णांनी व नातेवाईकांनी काही अडचण , मदत , गरज लागल्यास *7559106003* या संपर्क नंबर वर संपर्क करा किंवा ई-मेल,व्हाट्सअप आणि प्रत्यक्ष कॉल दारे अर्थात फोनवर संपर्क केल्यास अवघ्या 5 मिनिटांपासून ते लवकरात लवकर सेवा पुरविण्यासाठी ही कंपनी तत्पर असेल अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली आहे.