Home चंद्रपूर साठगांव येथे श्री चक्रपाणी महाराज अवतरणदिन साजरा 

साठगांव येथे श्री चक्रपाणी महाराज अवतरणदिन साजरा 

165

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19ऑक्टोबर):-शंकरपुर येथुन उत्तरेला ८ किमी अंतरावर असलेल्या महानुभाव श्रीदत्त मंदिर साठगांव येथे श्री चक्रपाणी महाराज अवतरण दिन, पंचावतार उपहार व भेटकाळ पर्व सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी ध्वजारोहन, १२ वाजता पंचावतार उपहार आरती , व लगेच ज्ञानसभा व शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत श्री मुधोव्यासबाबा शास्त्री, वरोरा हे होते. ज्ञानसभेचे उद्घाटन महंत श्री एकोबासबाबा शास्त्री, खुटाळा (चंद्रपुर) यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. तर ध्वजारोहण महंत लक्षराजदादा कवीश्वर भंडारा यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महंत श्री. वंकीराजदादा अष्टुणकर, महंत श्री कृष्णराजदादा दर्यापुरकर हे होते. याप्रसंगी महंत चक्रपाणी न्यायंबास, त.अल्काताई आंबेकर, त.सरीताताई दर्यापूरकर, त.स्वाती दर्यापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन तपस्विनी लताताई कवीश्वर साठगांव यांनी केला होते. कु. रेवती दर्यापूरकर हिने स्वागत गीत सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सद्भक्त विनोद गांवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आशिष वैद्य यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता साठगांव परिसरातील सद्भक्त मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.