Home महाराष्ट्र निर्विवाद वर्चस्वासाठी आ. महेश शिंदे सहकार्यांना संधी देणार

निर्विवाद वर्चस्वासाठी आ. महेश शिंदे सहकार्यांना संधी देणार

400

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.22ऑक्टोबर):-जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी नुकतीच आरक्षण जाहीर झाल्याने खटाव जिल्हा परिषद गट व खटाव पंचायत समिती गण तर पुसेगाव पंचायत समिती गण नागरिकांचा महाराष्ट्र महिलेसाठी आरक्षित झाला आहे. खटाव गण आणि गट सर्वसाधारण आरक्षण असल्याने कोरेगाव खटाव सातारा चे आमदार महेश शिंदे यांच्याकडे आता मजबूत कार्यकर्त्याच्या फळी सह विश्वासू सहकार्यांची फळी सुद्धा मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरेगाव, खटाव,सातारा तालुक्यातील जनता आ.महेश शिंदे हाच पक्ष म्हणून मतदान करत असते. त्यामुळे कोण कोणत्या पक्षातून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतोय यापेक्षा आ.महेश शिंदे यांचा उमेदवार कोण असणार आहे, याकडे खरंतर जनतेचे लक्ष आहे. कोरेगाव,खटाव,आणि सातारची जनता ही कोणता पक्ष न मानता आ,महेश शिंदे हाच पक्ष म्हणून मतदान करत असते. मग ती निवडणूक खासदारकी पासून ते सोसायटीच्या चेअरमन व्हॉइस चेअरमन पर्यंत महेश शिंदें साठी तितकीच महत्त्वाचे असते. आणि ती जबाबदारी ते लिलया पार पाडत असतात.

             पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना त्याला खिंडार पडण्याचे काम आ.महेश शिंदे यांनी केले. आत्तापर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा कल ज्या दिशेने असतो त्याचे सरकार बनते असं म्हणतात. आणि त्या कलाची जबाबदारी महेश शिंदे यांनी पुरेपूर पार पाडली. आणि त्यासाठी त्यांच्याकडे विश्वासू अशी सातारा कोरेगाव खटाव व सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये एक विश्वासू फळी आहे त्यातील एक नाव आहे. खटावचे महेश घाडगे (पिंटू)

            आपला माणूस म्हणून सर्वतोपरी पंचक्रोशीत प्रचिती आहे. समाजकारण, ज्याला राजकारणाचा लवलेश नाही. महेश शिंदे हाच पक्ष म्हणून काम करणारे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा न करता व अपेक्षाही नाही असे एकमेव व्यक्तिमत्व महेश घाडगे यांना संधी देतील परंतु ती संधी घाडगे स्वीकारणार का, संधी मिळालीच तर संधीचं सोनं करावं व त्यांच्यामार्फत जनतेचे हित साधावा अशीच जनभावना खटाव पंचक्रोशीतील जनतेची आहे.