Home महाराष्ट्र पिंपळखुटा सर्कलमधून हितेश साबळे यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दावेदारी पक्की ! 

पिंपळखुटा सर्कलमधून हितेश साबळे यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दावेदारी पक्की ! 

143

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.30ऑक्टोबर):-मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा मोठा जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे हितेश साबळे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दावेदारी निश्चित केली आहे. त्यांच्या दावेदारीला स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळत असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हितेश साबळे यांनी शेतकरी चळवळीमध्ये देवेंद्र भुयार यांचं बोट धरून राजकारणामध्ये प्रवेश केला असून स्वाभिमान निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे राजकारणातील त्यांचं वैशिष्ट्य असून आयुष्यातील बारा वर्षाच्या प्रवासामध्ये देवेंद्र भुयार यांच्यासोबत राहून शेतकऱ्यांसाठी केलेला संघर्ष, शेतकरी चळवळीपासून ते विधानसभेच्या प्रवासापर्यंत काम करण्याचा संपूर्ण अनुभव असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या असून हितेश साबळे विश्वासू कार्यकर्ते म्हणून सक्रिय असून, जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सतत आवाज उठविला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याप्रती सहानुभूती निर्माण झालेली आहे. 

हितेश साबळे हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवत असून त्यांच्या प्रामाणिक आणि जनसंपर्कशील स्वभावामुळे ते मोर्शी तालुक्यामध्ये लोकप्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी चळवळीमध्ये तयार झालेले असून देवेंद्र भुयार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत. देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली हितेश साबळे यांनी पक्षविस्तार आणि जनसेवा यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्थानिक नागरिकांनीही हितेश साबळे यांच्या उमेदवारीचे स्वागत करत “जनतेचा माणूस” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कृषी मंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन उपोषण चिकाटी जिद्द मेहनत तळागाळातील गोरगरिबांबरोबर असलेला संवाद आणि बारा वर्षापासून पिंपळखुटा मोठा जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व लोकांबरोबर ठेवलेला संपर्क व सततच्या कामांच्या भारोश्यावर संधी मिळेल अशी आशा हितेश साबळे यांनी व्यक्त केली.