Home चंद्रपूर आजाद समाज पार्टी स्वबळावर न.प. निवडणूक लढणार

आजाद समाज पार्टी स्वबळावर न.प. निवडणूक लढणार

222

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.6नोव्हेंबर):- महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषीत केला असून नगर परिषद व नगर पंचायत च्या निवडणूका 2 डिसेंबर ला होणार आहेत. विधानसभा निवडणूकीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या आजाद समाज पार्टीने ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामूळे सत्ताधारी व विरोधी पक्षाने भुवैय्या उंचावल्या आहेत.

                चिमूर व ब्रम्हपूरी विधानसभा अध्यक्ष अमित भिमटे यांनी पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधताना सदर माहिती दिली. चिमूर नगर परिषदेत एकून दहा प्रभाग असुन दहाही जागेवर उमेदवार उभा करण्याची त्यांनी मंशा व्यक्त केली. एवढेच नाही तर भिसी नगर पंचायत मध्ये होणाऱ्या 17 प्रभागामध्ये निवडणूक लढणार असल्याचे सांगीतले. भाजपा ला हरवीण्यासाठी काँग्रेस आणि वंचीत बहुजन आघाडी सह सर्व मित्रपक्षानी नुकतीच वज्रमुठ बांधली असल्याच्या बातम्या येत असतांना आजाद समाज पार्टी ने रणशिंग फुकले त्यामुळे राजकीय समीकरण बांधणाऱ्यांच्या कपाळावर आट्या पाहयला मिळत आहेत.

                चिमूर नगर परिषदेत एकून दहा प्रभाग असुन नगराध्यक्ष पद अनुसुचीत जाती (महीला) करीता राखीव करण्यात आले आहे. तर भिसी नगर पंचायत मध्ये अनुसुचीत जाती करीता राखीव आहे. चिमूर मध्ये एकून मतदाराची संख्या 22557 असुन11165 पुरुष मतदार तर11392 महीला मतदारांचा समावेश आहे. भिसी नगर पंचायत मध्ये 8900 एकून मतदार आहे. 17 नगरसेवक निवडण्यात येणार आहे.

                 मागील काही वर्षात अमीत भिमटे यांचे नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्रात आजाद समाज पार्टीने चांगला जम बसवला असुन आगामी निवडणूकांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षासह विरोधकांची समीकरणे बिघडणार असल्याचे बोलल्या जात आहे.