Home चंद्रपूर नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेससह मित्रपक्षांची ‘वज्रमूठ’

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेससह मित्रपक्षांची ‘वज्रमूठ’

143

▪️चिमुरात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.6नोव्हेंबर):-चिमूर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपविरोधात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (श. प.) व वंचित बहुजन आघाडीच्या पक्षांची वज्रमूठ बांधली जात असून, एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे.

       चिमूर येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकी संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली पाहिजे. यावर सर्वांचे जवळपास एकमत झाले असल्याची माहिती आहे. यामुळे ही सर्वपक्षीय एकत्रित असलेली वज्रमूठ भाजपाविरोधात रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. यावेळी सदर बैठकीचे आयोजन काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष विजय गावंडे यांनी केले होते.

या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, शिवसेना विधानसभा प्रमुख बालु सातपुते, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रकाश पोतराजे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे, युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, एन. आर कांबळे, शहर अध्यक्ष शालिक थुल, चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजू चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पोतराजे, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष सुधाकर निवटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, शिवसेनेचे चिमूर शहराध्यक्ष नितीन लोणारे, राष्ट्रवादी भिशीचे शहर अध्यक्ष किशोर गभणे, राष्टवादी युवक काँग्रेसचे अमेय नाईक, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादीचे शाहीद शेख आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.