Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या अधिवेशनात मांडण्यासाठी आमदार यांना राजेंद्र कांबळे...

महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या अधिवेशनात मांडण्यासाठी आमदार यांना राजेंद्र कांबळे यांनी दिले निवेदन

124

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.8नोव्हेंबर):- राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संस्थापक अध्यक्ष सुरेश शंकर केसरकर तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत कामगार राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या मागण्या विविध विधानसभेत तसेच अधिवेशनात मांडण्यासाठी व मंजूर करून घेण्याबाबत भांडुप विधानसभेचे आमदार अशोक धर्मराज पाटील यांना प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिसला भेट देऊन पत्र समक्ष सादर केले. 

   प्रधान सचिव (कामगार) यांच्या वतीने नामदार कामगार मंत्री महोदयांना शासनाच्या विविध विभाजनाचा पुरस्कारार्थीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस मधून सवलत मिळणे बाबत योजना स्वरूपात प्रस्ताव अंतिम मंजूर केलेला नाही. राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार या योजनेचा लाभ मिळत नाही.

अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मंडळाच्या वतीने केलेल्या प्रस्तावामुळे राज्य सरकार वरती कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक भार पडत नाही. या योजनेच्या सर्व खर्च कामगार कल्याण मंडळ करणार आहे अशा बरेच मागण्या त्यावेळी सादर केल्या व त्यावेळी आमदार अशोक पाटील यांनी मी माझ्या परीने विधानसभेत मांडतो असे आश्वासन दिले.