

▪️साहित्य संमेलनासाठी लाखनीनगरी सज्ज
▪️महाराष्ट्रातून येणार दिग्गज साहित्यिक
▪️मराठी भाषा, साहित्य, लोककला आणि संस्कृतीवर होणार दोन दिवस चर्चा
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.11नोव्हेंबर):-लाखनी येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी/नान्होरी जि. भंडारा द्वारा आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा साहित्य संमेलन लाखनी येथील उत्सव सेलिब्रेशन हॉल अँड लान, राष्ट्रीय महामार्ग, भंडारा रोड,लाखनी येथे दि. 15 आणि 16 नोव्हेंबर 2025 रोज शनिवार आणि रविवारला संपन्न होणार आहॆ.
प्रसिद्ध रंगकर्मी आणि समीक्षक डॉ. संजयकुमार निंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उदघाटन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे करणार आहेत.उदघाटन आणि समारोपीय सत्रात तथा परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
दोन परिसंवाद, एक चर्चासत्र, कविसंमेलन, सहा लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, शाहीर अरुण बन्सोड यांची खडीगंमत, डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची प्रकट मुलाखत, पालिकचंद बिसेन आणि अनिल शेंडे यांची बासरीवादनाची जुगलबंदी, झाडीपट्टीतील युवा कलावंतांचा पंचरंगी
लोककलाविष्कार – ‘झाडीपट्टीचा धुमधडाका ‘, महेंद्र गोंडाने यांचा एकपात्री नाट्यप्रयोग – ‘ सहावी बाळंतीण ‘ अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहॆ.
दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक आणि मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सुरेश खोब्रागडे, स्वागताध्यक्ष संजय वनवे, निमंत्रक प्रा. डॉ. युवराज खोब्रागडे, स्वागत समिती अध्यक्ष रामेश्वर बिसेन,आयोजन समिती सचिव डॉ. रेवाराम खोब्रागडे, तथा सुरेंद्र बन्सोड, गजेंद्र गजभिये, भास्कर पिंपळे, नामदेव कानेकर, प्रा. उमेश सिंगनजुडे, आशाताई वनवे, वैशाली निंबेकर, सुमनताई कानेकर,कमलताई गणवीर,राजेश खराबे, साधना शिंगाडे, डॉ. मुक्ता आगाशे,आकाश भैसारे, लवकुश निर्वाण,जयेंद्र मेश्राम, विक्की इलमकर, प्रमोद लांडगे, देवराम शेंडे, राजू वासनिक, भावेश कोटांगले, अश्विनी भिवगडे, बाबुराव निखाडे,गोपाल नाकाडे, रंजित वासनिक, शिरीष निर्वाण, नलिनी ढवळे, वीणा डोंगरे,मंगलमूर्ती किरणापुरे, दिनेश पंचबुद्धे,विष्णू चाचेरे,दीपक जनबंधू,प्रा. अशोक गायधनी, नेहाल कांबळे आदी कार्यकर्त्यांनी केली आहॆ.







