Home महाराष्ट्र बोथली च्या सुनेचा पुण्यात साहित्य दरबारात सन्मान 

बोथली च्या सुनेचा पुण्यात साहित्य दरबारात सन्मान 

264

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.20नोव्हेंबर):-मोहाडी तालुक्यातील बोथली या छोटास्या गावातील रहिवासी भारती तितीरमारे यांना दिनांक 16 नोव्हेंबर ला पुणे येतील क्रांतीज्योती सावित्री बाई फुले सभागृहात शिंधु ताई सपकाळ आदर्श साहित्यिका म्हणून गौरविण्यात आले. कथा कादंबरी नाटक कविता लेखना द्वारे त्यांनी केलेल्या जनजागृती कार्या साठी हा पुरस्कार आहे. श्रपित कस्तुरी ढसाललेली भिंत कथा संग्रहाच्यामाध्यमातून स्त्री मुक्तीची चळवळ उभारण्याचे कार्य त्यांनी केल.

भारती तितीरमारे बोथली येतील माजी सरपंच कैलास तितीरमारे यांच्या पत्नी आहेत.वडील ह. भ. श्री. चक्रधर रेहपाडे महाराज यांची शिकवण यांच्या जीवनात मोलाची ठरली. या खेडे गावात राहून सुद्धा आपले छन्द आणि कौशल्य जोपसावेत असा संदेश सौ भारती कैलास तितीरमारे यांनी आपल्या सारख्या असंख्य गृहिणीनां दिला यांनी केलेल्या कार्या बद्दल परिसरातुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.