Home महाराष्ट्र दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कार्यकर्त्याची मोठी जबाबदारी-राजेशजी कुंभलकर यांचे प्रतिपादन

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कार्यकर्त्याची मोठी जबाबदारी-राजेशजी कुंभलकर यांचे प्रतिपादन

158

▪️कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन 

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.3डिसेंबर):- दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबाबत जनजागृती निर्माण करणे आणि समाजात संवेदनशीलता वाढविणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाची ध्येय गाठत असताना समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलताना समाजातील कुठल्याही दिव्यांग व्यक्ती हा शासकीय योजनांपासून किंवा लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. समाजामध्ये आढळून येणारा हा दिव्यांग समुदाय हा शोषित किंवा पीडित न राहता मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाज कार्यकर्त्यांची जबाबदारी प्रचंड मोठी असल्याचे प्रतिपादन संचालक राजेशजी कुंभलकर यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मत व्यक्त केले.

जगभरात दरवर्षी ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जात असल्यामुळे *सेवार्थ, सी.एस. आर. आणि सोशल इम्पॅक्ट सेल* च्या माध्यमातून शाश्वत विकासाची ध्येय गाठता यावी म्हणून कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा, महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन म्हणून परिसंवाद आणि रॅली काढण्यात आली. 

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की “दिव्यांगत्व हे कमजोरी नसून विशेष क्षमता आहे. समाजाने सहानुभूती नव्हे, तर संधी देण्याची गरज आहे.” प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेशजी कुंभलकर, श्री सुनील दिवे यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी उपलब्ध सरकारी योजना आणि कौशल्यविकासाच्या संधींबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री युगांत कुंभलकर,अध्यक्ष श्री प्रकाशजी कुंभलकर व संचालक राजेशजी कुंभलकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात आली. “दिव्यांग नव्हे, सक्षम”, “भेदभाव नको — सन्मान हवा”, “समावेशक समाज — संवेदनशील भविष्य” असे प्रभावी घोषवाक्य देत शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. रॅलीला विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. डब्ल्यू. भाग-1 ची विद्यार्थिनी कु. अमिषा घोडे हिने केले तर आभार प्रदर्शन बी.एस.डब्ल्यू. भाग-2 ची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री उडान हीने केले. दिवसाच्या शेवटी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी व सन्मान मिळावा यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.