

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.12डिसेंबर):- भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झालेने महाराष्ट्र शासनाचे वतीने ” घर घर संविधान” जनजागृती उपक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत राबविणेत येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शैक्षणिक संकुल, शासकीय निवासी वसतिगृह अनुदानित / विनाअनुदानित शाळा महाविद्यालय तसेच सर्व ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता ,नागरिकांचे अधिकार , कर्त्यव याबाबत जागरूकता वाढविणे साठी विविध उपक्रम व सार्वजनिक कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
परंतु सातारा जिल्ह्यामध्ये २६ नोव्हेंबर संविधान दिना व्यतिरिक्त या जनजागृती उपक्रमाची व्याप्ती झालेली दिसून येत नाही, तरी संपूर्ण सातारा जिल्हा मध्ये सर्व शैक्षणिक संकुल व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत तलाठी कार्यालय व शहरी स्तरावर वरील नमूद शासन निर्णय मध्ये जे १० सूचना वजा संविधान जनजागृती चे कार्यक्रम दिले आहेत त्याची प्रभावी अमलबजावणी करणेत यावी जेणेकरून सर्व जनसामान्य जनते मध्ये भारतीय संविधाना प्रति प्रबोधन होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी निवेदणाद्वारे केली आहे.
*भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सर्व शासकीय निमशासकीय कार्यलया द्वारे ऐकून 60 दिवस शासन निर्णया प्रमाणे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे यासंबधी हेतूपरस्पर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करणेत यावी*.
*किरण खरात*
*(सामाजिक कार्यकर्ते)*







