

✒️आरमोरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
आरमोरी(दि.23डिसेंबर):-केंद्रीय मंत्रिमंडलाने पुज्य बापू रोजगार हमी योजना ह्या नविन मंजुरी होती, माञ हिवाळी अधिवेशनात विकसित भारत गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन नावाने नवे विधायक सादर करण्यात आले असुन त्याचे लघुरुप व्हीजी-जी -राम-जी आहे, राम शब्द येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे, महात्मा गांधी ह्यांचे नांव दोन दशकापासुन अंमलात आलेला रोजगार हमी कायदा रद्द करणे म्हणजे महात्मा गांधीजींचा अपमान होय,हि केवळ प्रशासकीय बाब नसून गांधींच्या मुल्यांप्रती तिरस्काराची कृती आहे, म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा रद्द न करता व व्हीबी-जी-राम-जी हे नविन विधायक मागे घेण्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन व त्यानुषंघाने भारतीय कम्युनिस्ट पाटीॅ जिल्हा गडचिरोली च्या वतीने आरमोरी तहसीलदार मार्फत श्रीमान नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान, भारत सरकार, नवी दिल्ली,आणि मा.शिवराज चौहान, ग्रामीण विकास मंञी,भारत सरकार, यांना भाकपा चे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ. डाॅ. महेश कोपूलवार यांचे नेतृत्वात जिल्हा सहसचिव काॅ.ॲन्ड.जगदिश मेश्राम , आरमोरी तालुका अध्यक्ष काॅ.प्रकाश खोब्रागडे, प्रशांत खोब्रागडे ,संजय वाकडे,मनोज दामले ,कमलेश गोवर्धन,निलेश मेश्राम, सुनील गजभिये, अंकुश दुमाने,कॄतिका दुमाने, राजाराम राऊत,शंकर सावसागडे,ऋषी वाकडे,अशोक सावसागडे, ऋषी रामटेके,इत्यादी निवेदन देतांना उपस्थित होते.
भारतातील ग्रामिण बेरोजगारांना वीस वर्षांपासून रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा रद्द करुन लघुरुपात राम नाव येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रातील सरकारने हा हास्यास्पद प्रकार केलेला आहे
वीस वर्षांपूर्वी मनरेगा कायद्यात दुरुस्ती करून वर्षात दोनशे दिवस काम मिळण्याची व किमान सातशे रुपये दररोज वेतन मिळण्यासाठी भाकपाने अनेकदा आंदोलने ,निवेदने दिली आहेत.मात्र नविन विधेकात दोनशे चाळीस रुपये मंजूरीची तरतूद आहे,हा महागाईच्या काळात कष्टकऱ्यांवर अन्याय आहे, मनरेगा कायद्यात अंतर्गत शंभर दिवस देशात कुठेही काम मिळत नाही,
रोजगाराचे हक्क हिरावून घेणाऱ्या व शेती कामाच्या दिवसात रोजगाराची मागणीच करता येणार नाही,अशी अजब अट लादणाऱ्या या विधेयकाला तीव्र विरोध असून हे विधेयक तातळीने मागे घ्यावे,व मनरेगा कायदा अधिक मजबूत करावा, नवीन विधायेक मागे न घेतल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय खेत मजदुर युनियन,लाल बावटा शेतमजुर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, संयुक्तपणे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.







