

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.डिसेंबर):- विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता रद्द करण्यात येऊन शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रद्द केलेली पदे पुन्हा भरण्यात यावे याकरिता संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री , उच्च शिक्षण मंत्री यांना भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता सुरू केल्यामुळे शाळेचे अनेक वर्ग व वर्ग तुकड्या कमी होऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही अतिरिक्त ठरविण्यात आली आहे .तसेच शासनाच्या या संविधान विरोधी निर्णयामुळे अनेक मराठी प्राथमिक शाळा बंद पडले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत .परिणामी तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार उभी राहणार आहे. त्यामुळे संच मान्यते करिता विद्यार्थी संख्येची अट व निकष शिक्षण विभागाने रद्द करून संच मान्यतेचे परिपत्रक मागे घेण्यात यावे.
तसेच शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या एका परिपत्रकाद्वारे सीडीतील महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी शिपाई ,प्रयोगशाळा मदतनीस ,सफाई कर्मचारी, इत्यादी कर्मचाऱ्यांची सर्व पदे निरस्त रद्द केलेली आहेत .चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सर्व पदे रद्द केल्यामुळे शाळा , कॉलेज कशा चालवाव्यात हा गहन प्रश्न शाळा महाविद्यालयासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे रद्द करण्यात आलेली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पूर्ण नव्याने सुरू करण्यात यावी व सदरचे परिपत्रक रद्द करण्यात यावेत. कल्याणकारी राज्यात प्रत्येकाला शिक्षण देणे शासनाची जबाबदारी व कर्तव्य आहे. जनतेचे हे अधिकार शासन हिरावून घेऊ शकत नाही. या निर्णयामुळे अनेक मराठी शाळा बंद पडले आहेत. हे संविधान विरोधी कृत्य आहे.
संच मान्यतेचे विद्यार्थी संख्येचे निकष अटी दूर करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पूर्ण बंद केलेली पदे पूर्ववत सुरू करण्यात यावी व उपरोक्त दोन्ही परिपत्रक रद्द करण्यात यावे. निवेदन देताना संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष रोशन जांभुळकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, साहित्यिक अमृत बनसोड, ज्ञानचंद जांभुळकर, चंद्रशेखर खोब्रागडे, अजबराव चिचामे,आसित बागडे ,सदानंद इलमे, वामनराव गोंधळे ,दिलीप वानखेडे ,इंजिनीयर रूपचंद रामटेके, श्रीकृष्ण पडोळे, विश्वनाथ नंदागवळी बंडू फुलझेले, डॉ. रवींद्र जनबंधू,हंसराज वैद्य ,संजीव भांबोरे प्रामुख्याने उपस्थित होते.







