

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179
चंद्रपूर(दि.31डिसेंबर):– सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर येथील संगणक विभाग ग्रंथालयाद्वारे वाचन प्रोत्साहन दिन तसेच पुस्तकप्रेमी दिवस साजरा करण्यात आला दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर व संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर यांनी सरस्वती माता व डॉ. एस. आर. अंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केले. प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी एआय व डिजिटल युगात मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता प्रभाव असताना पुस्तक वाचनाचे महत्व काय आहे सोबतच ग्रंथालयाचा वापर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा होय. ग्रंथालयामध्ये वाचन उपक्रम पुस्तक प्रदर्शन भरवल्याने विद्यार्थी उपलब्ध ग्रंथ संपदेबद्दल जागरूक होईल आणि त्याला वाचनाची रुचि निर्माण होईल आणि नुसते विद्यार्थीच नाही तर शिक्षकांना सुद्धा वाचनाची गोडी लागावी असे संबोधनात नमूद केले. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावावी व ग्रंथालयाचा वापर करावा तसेच ग्रंथालयातील विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर यांनी आवाहन केले.
ग्रंथालय वाचन प्रोत्साहन दिन तसेच पुस्तकप्रेमी दिवस साजरा करताना मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते तेव्हा या कार्यक्रमाचा आयोजनकर्ता सहाय्यक ग्रंथपाल श्री. सुशील फाळके तसेच ग्रंथपरिचर निखिल जोशी, शालिनी डोंगरे यांनी परिश्रम घेतले. संगणक शास्त्र विभाग ग्रंथालयाद्वारे घेण्यात आलेल्या वाचन प्रोत्साहन दिन व पुस्तकप्रेमी दिवस घेतल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी शुभेच्छा दिल्या.







