Home महाराष्ट्र एक सुसंवाद आयुष्य बदलू शकतो-पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी

एक सुसंवाद आयुष्य बदलू शकतो-पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी

162

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

आज शालेय जीवनापासूनच विद्यार्थिनी वेगवेगळ्या संकटात सापडत असून कमी वयापासून शोषण होत असल्याने उमलणाऱ्या कळ्या कोमोजून जात आहेत दुर्दैवाने शोषण करणाऱ्यांमध्ये ओळखीचे,जवळचे नातेवाईकांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता व्यक्त करून विद्यार्थिनीशी एक संवाद त्यांच आयुष्य बदलू शकतो व सक्षम महिला बनण्यास मदत करू शकते असे प्रतिपादन परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले 

श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड तथा पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एक संवाद विद्यार्थिनीशी” या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच हा कळाला पाहिजे व नकार देण्याची वृत्ती विद्यार्थिनींमध्ये बळावली पाहिजे असे कार्यक्रमाचे व्याख्याते मिलिंद पोक्षे यांनी केले.

व्यासपीठावर पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे,प्राचार्य डॉ.बी.एम.धूत,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गीते, उपप्राचार्य डॉ.संतोष गायकवाड, डॉ.पी.आर.सुर्वे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गीते,पोलीस उपनिरीक्षक सिंघनवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुचिता शिंगाडे,बाबाराव बेदरे,दामिनी पथकाच्या पोळ इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आशिष देशमुख प्रा.अर्चना कातळे,प्रा.डॉ वर्षा भुतडा,प्रा.मुंजाजी चोरघडे,डॉ.सचिन खोकले,प्रा.विजय बेरळीकर,विश्वनाथ जवादे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश सातपुते यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ.संतोष गायकवाड यांनी मांनले