

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.3जानेवारी):-केंद्रस्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद केंद्र शाळा वायगाव येथे उत्साहात पार पडली .या स्पर्धेत चोरटी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत चमक दाखविली.
प्राथमिक गटात चित्रकला स्पर्धात मोनाली विनोद राऊत , वादविवाद स्पर्धात नयन लीलाधर पारधी , बुद्धिमापन स्पर्धात रणवीर सुधाकर शेंद्रे ,स्मरणशक्ती स्पर्धात उत्कर्ष आनंददास सराटे , स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धात शौर्य भीमराव सोनडवले, स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धात सक्षम संदीप ठाकूर ,एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धात देवांश अरुण राऊत तर माध्यमिक गटात स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धात अवनी अतुल निमगडे ,
सुंदर हस्ताक्षर स्पर्धात भूमिका हेमराज ढोरे , श्रुती भीमराव सोनडवले स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा वादविवाद स्पर्धात प्रतिज्ञा विष्णुकांत पत्रे , चित्रकला स्पर्धा व कथाकथन स्पर्धात अक्षरा दिलीप राऊत , गौरी रामपाल उईके ,एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धात नक्षम किशोर मेश्राम या विद्यार्थ्यांनी चोरटी या एकाच शाळेतून आपले नैपुण्य दाखित प्रथम क्रमांक पाठविला.
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश खरकाटे ,मुख्याध्यापिका डॉ.अनिता रवींद्र विखार ,सहाय्यक शिक्षक हर्षवर्धन गायधने, हीवराज बनकर सर, ज्ञानेश्वर सिधपुरे सर, धनराज सुरपाम सर तसेच सर्व शालेय व्यवस्थापन समिती समितीच्या सदस्यांनी केलेले आहे.







