Home गडचिरोली सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी केला विधवा भगिणींचा सत्कार

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी केला विधवा भगिणींचा सत्कार

125

✒️कुरखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुरखेडा(दि.18जानेवारी):-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मकरसंक्रांती निमित्त मूळ गाव देऊळगाव येथील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी विधवा महिला, मोलमजुरी करणाऱ्या महिला, आदिवासी महिला,सुहासिनी महिलांसाठी सामूहिक स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या स्वगृही केले होते. आजपर्यंत त्यांची बरेच सामाजिक उपक्रम सुध्दा राबवले आहेत. या आगळ्या, वेगळ्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे कार्यरत असणाऱ्या डॉ.प्रिया जुमनाके, प्रमुख वक्ते म्हणून कृषी सहाय्यक सपना कन्नाके,प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव येथील इंदू मेश्राम, वनिता मेश्राम,लता मिरी, प्रतिष्ठित नागरिक नानाजी खुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुजनाने झाली. संगीता ठलाल यांनी विधवा महिलांचा पुष्पगुच्छ, शाल, वस्त्रदान देऊन त्यांचा सत्कार केले सोबतच प्रमुख मान्यवरांचा सुद्धा पुष्पगुच्छ, शाल,भेटवस्तू देऊन सत्कार केला.

     वक्ते म्हणून बोलताना सपना कन्नाके म्हणाले की, महिलांनी स्वतःला ओळखले पाहिजे, कशालाही न घाबरता पुढे पाऊल टाकले पाहिजे, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. आपण सुशिक्षीत आहोत याचे भान ठेवले पाहिजे, संगीता ठलाल ह्या ज्याप्रमाणे परखडपणे लिखाण करतात तसेच कार्य कृतीतून सुद्धा करून दाखवतात म्हणून आज त्यांची समाजात विशेष ओळख आहे. समाजासाठी त्यांचे भरीव योगदान आहेत आणि त्या नेहमीच समाजाच्या हितासाठी कार्य करत असतात. अध्यक्षीय भाषणातून बोलताना डॉ.प्रिया जुमनाके म्हणाले की, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, दैनंदिन योगा केला पाहिजे.

स्त्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या असतात पण,स्वतः कडे दुर्लक्ष करू नये. स्वतःला कमी लेखू नये, नानाजी खुणे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. संगीता ठलाल यांनी उपस्थित महिलांना हळद, कुंकू, वाण देऊन सर्वांशी स्नेहबंधनाचे धागे विणले, हा सन्मान सोहळा बघून खास करून विधवा भगिणी गहिवरून गेल्या, कोणत्याही महिलांशी भेदभाव न करता सर्वच महिलांना एकत्रित आणून समाजाला दिशा दाखविणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करून संगीता ठलाल यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   त्यावेळी यामिना मलगाम,गिरीजा मिरी, दिक्षिका चौधरी,मिरा वालदे, हिना मरसकोल्हे, वैशाली कुमरे, लता गहाणे, पुर्णा ठलाल, पुडो,कांटेंगे, पदा,चंदनखेडे तसेच श्रीरामनगर वृंदावन कॉलनी येथील बहुसंख्येने महिला उपस्थित होते. आयोजन आणि प्रास्ताविक संगीता ठलाल यांनी केले,सुत्रसंचालन रेखा मोहणे यांनी केले तर आभार विद्या पुस्तोडे यांनी मानले.