Home महाराष्ट्र पत्रकार व त्यांचे कुटुंबास ओ. पी. डी मोफत तर सर्जरी साठी पन्नास...

पत्रकार व त्यांचे कुटुंबास ओ. पी. डी मोफत तर सर्जरी साठी पन्नास ते पंचांहात्तर टक्के सूट देणार-सर्जन डॉ.के.पी.गारोळे

280

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.20जानेवारी):- येथे के.पी. गारोळे एज्युकेशन सेंटरमध्ये दर्पण दिन पत्रकार सोहळ्या पार पडला या वेळी आपले मात मांडताना सुप्रसिद्ध सर्जन डॉ. के.पी.गारोळे यांनी प्रथम पत्रकार सोहळा कार्यक्रम घेण्यास उशीर झाल्या बाबत दिलगिरी व्यक्त केली.

सर्जन डॉ. के.पी.गारोळे यांनी शिक्षण आणि आरोग्यावर काम करत सामाजिक बांधिलकी लक्षात घेता पत्रकार,शेतकरी अल्पभूधारक यांना के.पी. गारोळे एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षण फी मध्ये 20 टक्के सवलत दिली जाणार आहे, या प्रसंगी मंचावर उपस्थित संचालिका सौ.किरण गारोळे मॅडम (के.पी. गारोळे एज्युकेशन सेंटर गंगाखे )तसेच प्राचार्य एम.एम.सुरनर उपप्राचार्य जगदीश मंदोडे, उपस्थिती होते.याप्रसंगी प्रास्ताविक प्रा.होरगुळे यांनी केले असून सूत्रसंचालन प्राचार्य सुरनर यांनी केले.

सन्मान सोहळ्या निमित्त बोलताना म्हणाले,आरोग्य विषयक संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर माझ्यातील गुणवत्ता लक्षात घेता करियर साठी मी मुंबई,पुणे यासारख्या मोठ्या महानगरा मध्ये न जाता पे बॅक टू सोसायटी/समाजऋण भेटण्यासाठी आपल्या परिसरातील शेतकरी, अल्पभूधारक,पत्रकार यांना त्यांच्या पाल्यासाठी शिक्षण शुल्का मध्ये 20 टक्के सवलत देत सेवा देणार असल्याचे के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरचे मुख्य संचालक डॉ.गारोळे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी सन्मान सोहळ्या साठी उपस्थित सर्व पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला.