

▪️श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ललितरम्य भाषेत वर्णन करणारा ग्रंथ
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.20जानेवारी):- येथील मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री.शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात लेखक व कवी ना.शि.उर्फ भारतभूषण चाफेकर यांच्या ” शिवसस्था वटवृक्ष: विस्तारलेलं क्षितिज ” या ग्रंथाचे प्रकाशन उद्घाटक हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण, संस्था,अमरावती. संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण (सुप्रसिद्ध साहित्यिक),या ग्रंथाचे प्रस्तावनाकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, स्वागताध्यक्ष ॲड. जे. व्ही. पाटील (पुसदेकर), ॲड.गजाननराव पुंडकर, प्रा. वसंतराव पुरके,पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, डॉ. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ साहित्यिक हेमंत डोणगावकर, डॉ.पूनम चव्हाण, प्राचार्य डॉ. विनय राऊत,मा.जयदीप सोनखासकर,मा.शरदचंद्र बिडकर, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.डॉ. किशोर क्षत्रीय यांच्या हस्ते थाटात प्रकाशन संपन्न झाले.
” शिवसंस्था वटवृक्ष : विस्तारलेलं क्षितीज ” या ग्रंथामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था, डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे स्मृती भवन, डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन व कार्य यावरील लेखमाला व काव्य फुले ही सर्व माहिती कोल्हापूरच्या नील प्रकाशनाने २६४ पृष्ठामध्ये या पुस्तकात दिलेली आहे.प्रत्येक शिव सेवकाने वाचावा असा हा ग्रंथ लेखक ना.शि.उर्फ भारतभूषण चाफेकर यांनी शब्दबद्ध केलेला आहे.







