Home अमरावती राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक शक्ती-प्रा.अरुण बुंदेले

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक शक्ती-प्रा.अरुण बुंदेले

79

▪️राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती संपन्न

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.20जानेवारी):-  ” खंबीर व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या राजमाता जिजाऊंनी बालशिवाजीला सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न फुलविले.अत्यंत प्रतिकूल अशा कौटुंबिक,सामाजिक व राजकीय वातावरणात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. खंबीर नेतृत्व,करारी बाणा व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर त्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक शक्ती ठरल्या.”असे विचार साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

             ते राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त दि.१२ जानेवारी २०२६ ला राजमाता माँसाहेब जिजाऊ स्मारक अमरावती येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.

           कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती व उपेक्षित समाज महासंघातर्फे संपन्न झालेल्या राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण – सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रमुख वक्ते अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,प्रमुख अतिथी अभय पाटील,राजेश छेदानी,सामाजिक कार्यकर्त्या प्रा.उज्ज्वलाताई मेहरे,कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे,प्रवीण खंडारे,राजेश नामदेवराव तायडे, देविदास लहुजी तंतरपाळे होते.

        अध्यक्ष ,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांनी सर्वप्रथम राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.

    याप्रसंगी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वतःच्या ‘अभंग तरंग’ या काव्यसंग्रहातील ‘राजमाता ‘या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले .

राजमाता जिजाऊंचा इतिहास प्रेरणादायी – प्रा. श्रीकृष्ण बनसोड

              ” राजमाता माँसाहेब जिजाऊ प्रचंड लढाऊ वृत्तीच्या होत्या. बालशिवरायांना शिवराज्याची प्रेरणा देण्यापासून राज्याभिषेकाचे आयोजन करण्यापर्यंतचा त्यांचा अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे.महाराजांची जडणघडण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतानाच बहुजनांचा वैभवशाली इतिहास जिजाऊंनी शिवबांना सांगितला त्यातूनच शिवाजी महाराज घडले.” असे विचार अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.

        कार्यक्रमाचे संचलन प्रवीण खंडारे तर आभार राजेश तायडे यांनी मानले.

          कार्यक्रमाला ऋषिकेश जाधव, संकेत वारे,दुर्गेश परदेशी, वसंतराव भडके, रामकुमार खैरे, सुधीर घुमटकर, रवींद्र पाटील,धम्मपाल रामटेके, शिवलाल पवार,गोविंद फसाटे, निलेश म्हसकर,चंद्रकांत सुकळकर,सौ.नंदा बनसोड, सौ.मेघा निमकर यांच्यासह बहुसंख्य जनसामान्य उपस्थित होते.