Home Breaking News ब्रम्हपुरी उपअधीक्षक कार्यालयात सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे मोहन गोरखा

ब्रम्हपुरी उपअधीक्षक कार्यालयात सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे मोहन गोरखा

324

✒️रोशन मदणकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26जानेवारी):- जनतेच्या समस्यांचे निराकरण करताना अनेकदा अधिकारी वर्ग पळवाटा शोधतो, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र याला अपवाद ठरत ब्रम्हपुरीचे उपअधीक्षक मोहन गोरखा यांनी पदापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देत अल्पावधीतच जनतेच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे.

अधिकारी म्हणून नव्हे, तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जनतेशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तत्पर असणारे उपअधीक्षक म्हणून मोहन गोरखा ओळखले जात आहेत. केवळ जनतेच्याच नव्हे, तर कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनातही त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतून सकारात्मक छाप निर्माण केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील नीरस वातावरण बदलून परिसर अधिक स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी उपअधीक्षक मोहन गोरखा यांनी स्वखर्चातून पुढाकार घेतला आहे. कार्यालय परिसर गार्डनसदृश करण्याच्या उद्देशाने स्वच्छता, रंगरंगोटी व वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, शनिवारचा सुट्टीचा दिवस असूनही, काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले. ही बाब त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे व नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

खरा अधिकारी तोच असतो, जो दुपारच्या सुट्टीत चहा-पाण्यासाठी बाहेर गेला तरी त्या ठिकाणीही नागरिकांना मार्गदर्शन करतो—आणि हीच भूमिका उपअधीक्षक मोहन गोरखा सातत्याने बजावत असल्याचे नागरिक सांगतात.

या सर्व बाबींमुळे ब्रम्हपुरीचे उपअधीक्षक मोहन गोरखा यांच्याविषयी जनतेत मोठ्या प्रमाणावर आदरभाव निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.