Home Breaking News भरधाव हायवाच्या धडकेत न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू ; एक जण गंभीर...

भरधाव हायवाच्या धडकेत न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू ; एक जण गंभीर जखमी

350

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.8एप्रिल):-सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात दि.८ एप्रिल बुधवार रोजी स.१०.३० वा.सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा मुत्यृ झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात नगरपिलिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना भरधाव हायवा ट्रकने जोरदार धडक दिली.या अपघातात तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५ वर्ष)यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सहकारी धृपताबाई सुर्यभान वाघमारे (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत.या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिला कर्मचारी सकाळी सोनखेड परिसरात स्वच्छतेचे काम करत असताना एम एच १२ एफसी ७४५९ क्रांमाकाचा हायवा चालक आपल्या वाहनावरील ताबा गमावून त्याने थेट काम करत असलेल्या महिलांना धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, तुळसाबाई पाडुळे व धृपताबाई वाघमारे या गंभीर जखमी होऊन अस्वस्थ झाल्या.यावेळी नागरिकांनी त्यांना सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तुळसाबाई पाडुळे यांना डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले तर जखमी धृपताबाई वाघमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हायवा चालक विठ्ठल अंगद मुंढे (वय २४ वर्ष ) या.रेवली परळी या चालकास ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.या घटनेमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये ,नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या अपघातप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हायवा चालकांवर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.या प्रकरणांचा पोलिस तपास करत आहेत.